सामाजिक

सचिव अनुजा देशपांडे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – वर्धा बार असोसिएशन

Spread the love
वर्धा / आशिष इझनकर
वर्धा जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव अनुजा देशपांडे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी बार असोसिएशनचे सदस्य अॅड.हुड, अॅड अर्चना वानखेडे व अॅड. अनंत साळवे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेली आहे.
वर्धा जिल्ह्यातील वकीलांची वर्धा बार असोसिएशन नामक सोसायटीज अॅक्ट मध्ये नोंदणीकृत संस्था असून सन 2022-23 या कालावधीकरीता कु. अनुजा देशपांडे या सचिव म्हणून निवडून आल्या. सचिव म्हणून निवडून आल्यापासून त्यांची कार्यशैली कायम विवादास्पद राहीली. सदस्यांना विश्वासात न घेता एककल्ली वृत्तीने व वैयक्तीक लाभापोटी त्यांनी वर्धा बार असोसिएशनचा वापर करुन घेतलेला आहे. सदर कालावधीत संस्थेकडे सदस्यांचे सदस्य शुल्क, बार टायपिस्ट, व झेरॉक्स ऑपरेटर यांच्याकडून आलेले भाडे असे अंदाजीत सहा लक्ष रुपये जमा झाले. दिनांक 09/12/2023 रोजीचा कार्यकाळ संपलेला असतांना देखील अट्टाहसाने फेब्रुवारी महिण्यापर्यंत वार्षीक सर्वसाधारण सभा बोलावली गेली नाही. सदस्यांच्या वारंवार विनंतीला अव्हेरले गेले. सरतेशेवटी दिनांक 06/02/2024 रोजी सर्वसाधारण सभा बोलावून तोंडी हिशोब सांगून सभा कुठलाही ठराव न घेता व आलेल्या आक्षेपांना उत्तर न देता गुंडाळली गेली. सदस्यांनी बार्षीक हिशेब लेखी स्वरुपात मागितला असता तो देण्यास सचिव अनुजा देशपांडे यांनी ठामपणे नकार दिला.
मागील दोन वर्षापासून संस्थेच्या सगळ्या महत्वाच्या नोटीस या व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रकाशित करण्यात येतात. त्यामुळे सदस्यांनी सदरचा हिशोब व्हॉटसअॅपवर प्रकाशित करावा अशी मागणी केली व लेखी स्वरुपात 55 सदस्यांनी याबाबत संस्थेच्या अध्यक्षांना विनंती अर्ज केला. त्यावर अध्यक्षांनी सचिवांना सदर हिशोब सादर करण्याबाबत लेखी निर्देश दिले. परंतु तरीही सचिव अॅड अनुजा देशपांडे यांनी सदरचा हिशोब दिला नाही. यावरुन सचिव अनुजा देशपांडे यांनी वर्षभरात जमा झालेल्या सहा लक्ष रुपये इतक्या रक्कमेचा अपहार केला आहे. असा आरोप पत्रकार परिषद कर्त्यांनी केला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close