शैक्षणिक
रिल च्या नादात गमावली नोकरी


हैदराबाद /विशेष प्रतिनिधी
रिल च्या नादात आपण अनेकांना एव गमावल्याच्या बातम्या ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील पण रिल मुळे एका महिलेवर नोकरी गमावल्याची वेळ आली आहे. भुक्या गौतमी असे त्या महिला शिक्षिकेचे नाव आहे.सरकारी नोकरीत असलेल्या गौतमी यांच्या हातून सरकारी नोकरी गेली आहे. सरकारी नोकरीत असताना इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून खासगी शाळांना प्रमोट केल्याचा आरोप गौतमी यांच्यावर झाला.
याच आरोपांमुळे वर्षाच्या सुरूवातीला गौतमी यांना निलंबित करण्यात आलं होतं. पण वाद वाढत गेला. त्यामुळे आलेला दबाव गौतमी यांना सहन करता आला नाही. वाढती टीका, अपमान आणि दबाव यांच्यामुळे गौतमी यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय उरला नाही.
भुक्या गौतमी ममिललागुडेम शाळेत इंग्रजी विषय शिकवायच्या. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका व्हिडीओच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा केली. त्यावेळी त्या भावुक झालेल्या दिसल्या. निलंबित झाल्यानंतर दुसऱ्यांदा पोस्टिंग मिळाल्यावरही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (DEO) यांच्याकडून बराच अपमान आणि छळ सहन करावा लागल्याचा आरोप गौतमी यांनी केला.
मी आदिवासी समाजातून येते. माझी आर्थिक स्थिती बेताची आहे. माझ्या आई, वडिलांच्या कठोर मेहनतीमुळे मी शिक्षिका झाले. गरजू मुलांना शिकवणं हेच माझं ध्येय होतं आणि राहील. मी ठरलेल्या तासिकांसोबतच विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे विशेष तास घ्यायचे, असंही गौतमी यांनी सांगितलं.
डीईओंनी मला बरेच तास वाट पाहायला लावली. मला भेटायला वेळ दिला नाही. मला दुसऱ्यांदा नोकरीवर घेण्याची विनंती केली असता, त्यांनी माझा अपमान केला. मला अगातद्वा बोलले. याच गैरवर्तनामुळे, कामाच्या ठिकाणी असलेल्या दबावामुळे आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे मी खूप दुखावले, अशी आपबिती गौतमी यांनी मांडली.
इन्स्टाग्रामवर गौतमीचे जवळपास ३ लाख २८ हजार फॉलोअर्स आहेत. त्यांनी ९९०० पोस्ट केल्या आहेत. सरकारी शाळेत शिकवणाऱ्या गौतमी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका खासगी शाळेच्या प्रवेशाला प्रोत्साहन दिल्याचा ठपका गौतमी यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित केलं होतं.
हातून सरकारी नोकरी गेली आहे. सरकारी नोकरीत असताना इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून खासगी शाळांना प्रमोट केल्याचा आरोप गौतमी यांच्यावर झाला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1




