क्राइम

अखेर त्या पोलिस कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या

Spread the love
अकोला / विशेष प्रतिनिधी

अकोल्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या नराधम पोलीस कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अखेर बेड्या ठोकल्या आहेत. पवन उद्धवराव वडगावे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आरोपी मागील १३ दिवसांपासून होता. मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याने घरमालकाच्या अल्पवयीन < मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार कैले. मात्र, काही काळानंतर पवनने तिच्याशी लग्न करण्यास थेट नकार दिला. पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या या विश्वासघातामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडित मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
४२ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पीडित मुलगी कोमात गेली. तब्बल ४२ दिवस कोमात राहिल्यानंतर तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. उलटून गेले तरी आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे फरारच होता.
परंतु, गुन्हा दाखल होऊन  आरोपी मोकाट असल्याने  स्थानिक नागरिकांनी या प्रकरणावरून मोठा जनआक्रोश मोर्चा काढला होता. तसेच आरोपी पोलिसाला त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. आरोपी पोलिसावर कारवाई व्हावी, यासाठी शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना देखील एकवटल्या होत्या.
जनतेचा वाढता आक्रोश लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रं फिरवली. अखेर फरार असलेला आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला १३ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेने शोधून काढत बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस आता आरोपीची कसून चौकशी करत असून पुढील तपास केला जात आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close