क्राइम
त्याचे तिच्यावर होते एकतर्फी प्रेम, त्यातून त्याने वाजवला तिचा गेम


त्याची तसली मागणी संध्या ने लावली होती धुडकावून
तो करत होता तिचा पिछा, संध्याने पोलिसात दिली होती तक्रार
पोलिसांनी जर वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित…..
फरीदाबाद /विशेष प्रतिनिधीं
हरियाणाच्या फरीदाबाद जिह्यातील कोट गावातील सरस्वती सीनियर सेकंडरी स्कूल’ मध्ये संध्या करहाजा या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आपल्या शिकविण्याच्या शैलीमुळे त्या विद्यार्थी आणि पालक वर्गात लोकप्रिय होत्या. त्यांनी सात वर्षांपूर्वी विकास करहाजा सोबत प्रेम विवाह केला होता.आणि त्याचा संसार व्यवस्थित सुरू होता. त्या शाळेत शिकवत असताना त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अमित ने त्यांची चाकूने भोसकून हत्या केली होती. या घटनेने हरियाणातील फरीदाबादमधील सिक्रोना येथील समाजमन हादरले आहे.
एकतर्फी प्रेमातून हत्या
हरियाणातील फरीदाबादमधील डबुआ येथे जन्मलेल्या संध्या यांनी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्या त्यांचे पती विकास उर्फ विकी करहाजा यांच्यासोबत जवळच असलेल्या सिक्रोना येथे स्थायिक झाल्या होत्या. ‘सरस्वती सीनियर सेकंडरी स्कूल’मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी या परिसरातील अनेक खाजगी शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम केले होते.
जवळच्या कोट गावात राहणारा २१ वर्षांचा अमित सोमवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी शाळेत शिरला. संध्याला ‘विकी’ आल्याचं खोटं सांगून शाळेच्या गेटवर बोलवलं आणि भुलवून तिचा जीव घेतला. बाईकवरून पळून गेलेल्या अमितला अवघ्या दोन तासात बेड्या ठोकण्यात आल्या. संध्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार कोटमधील एका शाळेत ती शिक्षिका होती.अमित तिचा विद्यार्थी होता. त्यावेळी त्याने तिच्याकडे घाणेरडी मागणी केली होती. मात्र तिने धुडकावून लावत त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं.
“तिने अमितला नकार दिल्यानंतर त्याच्याशी बोलणं थांबवलं होतं. नऊ महिन्यांपूर्वी त्याने संध्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तिने पोलिसांत तक्रारही केली होती, परंतु त्याचे नातेवाईक हात जोडत आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला हे प्रकरण पुढे न नेण्याची विनंती केली. त्यांनी त्या मुलाला समजवण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे आम्ही ते प्रकरण तिथेच सोडून दिले” असं संध्याचे पती विकास यांनी सांगितले. तीनच महिन्यात अमितने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे विकास त्याच्या घरी गेला. मात्र त्याच्या कुटुंबाने पुन्हा तीच टेप वाजवली. त्यामुळे आम्ही तक्रार करणं टाळलं, असं विकास म्हणाले.
अमितने मर्यादा ओलांडल्या
विकासचा चुलतभाऊ पवन कुमार याने सांगितले की, अमितने एका महिन्यापूर्वीच सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. “त्याने विकीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तो म्हणाला होता, ‘जर ती माझी होऊ शकत नाही, तर मी तिला तुझीही होऊ देणार नाही.’ त्याचा मोठा भाऊ रवी याला या सर्व गोष्टींची कल्पना होती, पण त्याने काहीच केले नाही. हत्येनंतर कुटुंबीयांनी त्याला शांतपणे घरी परत येऊ दिले. ते या कटात सामील आहेत, तरीही एफआयआरमध्ये त्यांची नाव ?
परत येऊ दिले. ते या कटात सामील आहेत, तरीही एफआयआरमध्ये त्यांची नावे नाहीत. असे का?” असा सवाल त्याने केला.
विकासच्या म्हणण्यानुसार, अमितच्या नातेवाईकांचे जबाब अधिकृतपणे नोंदवले जातील तेव्हा त्यांचीही चौकशी व्हावी, अशी विनंती त्याचे कुटुंब पोलिसांकडे करणार आहे.
मुलं कावरीबावरी, आई दुःखी
संध्याचा पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी कावरेबावरे झाले आहेत. आपली आई कुठे आहे, याची विचारणा, ते सगळ्या नातेवाईकांकडे करत आहेत. “तिने मला अलिकडे मिळालेल्या धमक्यां बद्दल सांगितले असते तर मी तिला घरी घेऊन आले असते. आता हे घर एखाद्या स्मशानभूमीसारखे झाले आहे” असे म्हणताना संध्याची आई सुधा देवी यांना अश्रू आवरणे कठीण जात होते.
“एखादा कसाई जसा वार करतो, त्यापेक्षाही अधिक वेळा त्याने माझ्या मुलीवर वार केले.”
शाळेचे मुख्याध्यापक डॉ. तेजपाल शर्मा यांनी सांगितले की, संध्या गेल्या वर्षभरापेक्षा काही अधिक काळापासून शाळेत शिकवत होत्या. “सर्व मुलांना त्या खूप प्रिय होत्या. त्यांनी माझ्या एका मुलालाही शिकवले होते. मुले अस्वस्थ झाल्यामुळे मी त्यांना एका नातेवाईकाकडे पाठवले आहे” असे सांगतानाच शाळेतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी मान्य केले.
मुख्याध्यापक धावत पोहोचले
संध्याच्या किंकाळ्या ऐकल्या, तेव्हा सुरुवातीला पावसाळ्यामुळे एखाद्या मुलाला विजेचा धक्का बसला असावा, अशी समजूत झाल्याचं मुख्याध्यापक म्हणाले. “…मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा ती जमिनीवर पडली होती. हल्लेखोराने मला परत जाण्यासाठी ओरडून सांगितले, माझ्यावर हात उगारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मी काठी आणण्यासाठी परत गेलो, पण मी परत येईपर्यंत तो पळून गेला होता. मी जवळच्या पोलीस चौकीला कळवले आणि संध्याला रुग्णालयात नेले.
मुख्याध्यापकांनी संध्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. “आम्ही काही इतके गरीब नाही; उलट संध्या-विकास स्वतःसाठी दुमजली घर बांधत होते. केवळ ‘विकी’ असल्याचे भासवल्यामुळे आरोपीला इतक्या सहजपणे आत येऊ दिल्याबद्दल त्या शाळेलाच सील केले पाहिजे. आता आम्ही मुलांना तिथे का पाठवू?
त्यांनी आम्हाला २० लाख रूपये दिले तरीही आम्ही ते स्वीकारणार नाही” असे संध्याच्या मावशींनी सांगितले.




