सामाजिक

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र व मनपा आरोग्य विभागाच्या वतीने महिला मेळावा व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

अमरावती- कामगारांच्या कल्याणासाठी व कामगार कुटुंबासाठी सदैव महाराष्ट्र शासनाचे कामगार कल्याण केंद्र राधा नगर व मनपा अमरावती चे आरोग्य विभाग या संयुक्त विद्यमानाने महिला मेळावा मधे विविध योजनेचे मार्गदर्शन व शेकडो महिलांचे मोफत आरोग्य शिबिर केंद्र संचालक बबन बिडकर व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांचे आदेशानुसार व डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांचा सहकाऱ्याने घेण्यात आले ह्या कार्यक्रमात महिलांनी रोजगार कसा करावा व कोणते प्रशिक्षण घ्यावे याची माहिती कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली ,डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांनी स्वच्छता व शहरातील डेंग्यू,मलेरिया ,चिकन गुनिया होऊ नये या बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगितल्या,आरोग्य निरीक्षक हैदर अली यांनी डेंग्यू ,मलेरिया , चिकन गुनिया , हत्तीरोगाचे डास कसे असतात व ते कधी चावतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले डॉ.काशीफ अली शाह वैद्यकीय अधिकारी राधा नगर यांनी शेकडो महिला यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला ,डॉ मनीष ठाकरे वैद्यकीय अधिकारी विलासनगर यांनी सुद्धा औषधी पुरवल्या .कामगार नेते रामकृष्ण चिखलकर यांनी सुद्धा महिलांनी उद्योग धंदा सुरू करून आर्थिक बाजूने मजबूत होऊन आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले, डॉ जावरकर यांनी कार्यक्रम असाच नेहमी व्हावा ह्या साठी मदत करण्याचे आश्वासन दिले ह्या कार्यक्रमात राजेश खडसे ,आरोग्य सेवक निलेश लाडे, विशाल शिंदे ,अफवान अहमद, विजय चव्हाण ,प्रतीक्षा चव्हाण सुनीता झाडे ,प्रतिभा थोरात राजश्री शिरसाट ,पल्लवी गवई, मनीष पेठे , रंजना भावते, पूजा चोपडे यांनी आरोग्य शिबीरासाठी सहकार्य केले ह्या शिबिराची चर्चा संपूर्ण राधा नगर मध्ये होत असून बबन बिडकर व राजेश खडसे यांचे कौतुक होत आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close