शिक्षिकेचा लग्नाला तगादा,मॅनेजरने कार मध्ये केली हत्या; मृतदेह घेऊन दिवसभर हिंडला

शिक्षिकेचा लग्नाला तगादा,मॅनेजरने कार मध्ये केली हत्या; मृतीह घेऊन दिवसभर हिंडला
गोरखपूर / विशेष प्रतिनिधी
अनैतिक संबंधाचा शेवट हा रक्तरंजित होतो हे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. या घटनेत सुद्धा अनैतिक सबंध, लग्नाचा तगादा आणि आधीच विवाहित असलेल्या व दोन मुलांचा बाप असलेल्या पुरुषाला ते मान्य नसल्याने त्याने शिक्षिकेची हत्या केली.कार च्या मधल्या सीट वर तिची हत्या करून मृतदेह डीक्कीत टाकून दिवसभर फिरत राहिला. त्यानंतर मृतदेह एका शाळेजवळ टाकून पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विजय निषाद अटक केली आहे.
आरोपी आणि महिला शिक्षिकेमध्ये जवळचे संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विजयचं आधीपासूनच लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं होती, तर राणी विजयवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. यातून नाराज होऊन विजयने राणीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
विजयने त्याच्या कारच्या मधल्या सीटवर राणीची गळा दाबून हत्या केली, यानंतर त्याने राणीचा मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकला आणि पूर्ण दिवस तो आसपासच्या परिसरात फिरत होता. संध्याकाळी त्याने उत्तर प्रदेशच्या देवरियामधील रुद्रपूर भागातील एका शाळेजवळ राणीचा मृतदेह फेकला आणि तो फरार झाला.
शाळेमध्ये लग्नाबद्दल बोलणं
महिला शिक्षिका राणी विश्वकर्मा गोरखपूर जिल्ह्यातील झंगहा भागातील खुरुहरी गावातील रहिवासी होती. चौरी-चौरा भागातील नई बाजारमधल्या व्हीएन सेंट्रल अकॅडमीमध्ये राणी शिक्षिका होती. याच शाळेत विजय निषाद स्कूल मॅनेजर होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमधली जवळीक वाढली होती, पण विजयचं आधीच लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं होती. राणीला विजयसोबत लग्न करायचं होतं आणि यासाठी ती वारंवार विजयवर दबाव टाकत होती, यातूनच दोघांमध्ये वाद वाढत चालले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
कारमध्ये गळा दाबून हत्या
31 ऑक्टोबर 2026 च्या सकाळी 8.30 वाजता राणी शाळेमध्ये पोहोचली, तिथे तिने पुन्हा एकदा विजयसोबत बोलताना लग्नाचा विषय काढला, यानंतर विजयने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही राणी ऐकत नव्हती. यानंतर सकाळी 9.15 वाजता विजय तिच्या कारमधून राणीला घेऊन निघाला. मीठा बेल गावाच्या बाहेर सुमसाम कच्च्या रस्त्यावर दोघं पोहोचले. यानंतर विजयने कारच्या मधल्या सीटवर राणीचा गळा दाबून तिची हत्या केली, यानंतर त्याने राणीचा मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये ठेवला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून विजय निषादला अटक केली. पोलीस तपासात विजयने राणीची हत्या केल्याची कबुली दिली आहे, यानंतर पोलीस आता इतर साक्षी आणि पुरावे गोळा करत आहेत.




