क्राइम

कर्जत रेल्वे पोलिसांनी सुतावरून गाठला स्वर्ग

Spread the love

कर्जत / नवप्रहार ब्युरो

                    काही दिवसांपूर्वी कर्जत रेल्वे पोलिसाना कर्जत – लोणावळा मार्गावर  एका ट्रॉली बॅग मध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतक महिलेचा मृतदेह हातपाय दोरीने बांधून बॅग मध्ये कोंबण्यात आला होता. महिलेची हत्या करण्यात आलीं असल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनीच लक्षात आले होते . त्यामुळे खुन्याला शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

                कर्जत लोणावळा मार्गाच्या डाऊन लाइन वर पोलिसांना एक ट्रॅव्हल बॅग ज्यावर ट्रॅव्हल हब असे लिहिले होते. पोलिसांनी बॅग उघडून पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह दोरीने हातपाय बांधून होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपासाला सुरवात केली. पोलिसांजवळ कुठलाच पुरावा नसल्याने खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

अशी झाली तपासाला सुरवात — तपास पथकाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, कर्जत रेल्वे स्थानक व लोकमान्य टिळक टर्मिनस येथील एकूण 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे एक संशईत इसम घटनास्थळी मिळुण आलेल्या ट्रॉली बॅगच्या वर्णनाप्रमाणे बंग घेवून एक इसम बळाचा वापर करुन खेचत घेवून घेवून जात असताना दिसुन आला. त्यामुळे सदर इसमावरती संशय निर्माण झाला म्हणून लोकमान्य टिळक टर्मिनस येथील फ्लॅटफार्म क्रमांक 04 वरील वेगवेगळे कॅमेरे वेगवेगळया अँगलने तपास करण्यात आला. त्यावेळी संशयीत आरोपी व महिला 15 एप्रिल 2025 रोजी रात्री 22.17 वाजता मुंबई-कोइंबतूर एक्सप्रेस नंबर 11013 या ट्रेनमधील कोच क्रमांक 101496 बोगी क्र.ए-1 या एसी कोचमध्ये बसुन गेल्याचे निष्पन्न झाले.

 या कारणाने शंका  बळावली – त्या तपासी पथकाने रेल्वे प्रशासना कडील रिजर्वेशन विभागाचे मुंबई मुख्य कार्यालयात जावुन नमुद बोगी मधुन प्रवास करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त केली असता त्या बोगीमधुन एकुण 52 प्रवास करणा-या प्रवाशांची माहिती प्राप्त झाली. सदर यादीमधुन दोन संशईत इसमांनी रिजर्वेशन करण्यासाठी दिलेला मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर प्राप्त केले असता दोन्ही संशईत इसमांनी टिकोट कोइंबतूर पर्यंत बुक केले होते परंतु ते बेंगलोर येथे उतरल्याचे सीडीआर वरुन निष्पन्न झाले. नेरळ पोलीस ठाणे कडील तपास पथकाने तात्काळ बंगलोर येथे जावुन केएसआर बैंगलोर सीटी रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सदर दोन्ही संशईत आरोपीत दि. 16/04/2025 रोजी 20.56 वाजता मुंबई-कोइंबतूर एक्सप्रेस नंबर 11013 यामधुन उतरताना दिसत होते परंतु त्यावेळी नमुद आरोपीत यांचेकडे सदरची ट्रॉली बंग दिसुन न आल्यामुळे त्यांचेवरील अधिक संशय बळावला आणि नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बंगळूर येथे जाऊन त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

नेरळ पोलिसांनी केले मोलाचे सहकार्य –

त्यावेळी नेरळ पोलीस ठाणे कडील तपास पथकाने मोबाईलचा तांत्रिक पुराव्यांचा आधार घेवुन अत्यंत कौशल्याने सदर आरोपींचे वास्तव्याची माहिती प्राप्त करुन सदर संशईत आरोपींना बैंगलोर येथुन ताब्यात घेवून कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले. त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चोकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. दरम्यान आरोपीना आज रोजी मा. प्रथमवर्ग न्यायालय कर्जत येथे हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीना 16 मे 2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. त्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला.

एकाच फ्लॅट मध्ये राहत होते दोन तरुण आणि महिला –

ती २६ वर्षीय महिला अविवाहित होती. मात्र आरोपी तरुण आणि ती महिला असे तिघे मुंबईत एकाच फ्लॅट मध्ये राहत होते. सोबत राहणारी त्या दोन्ही तरुणांचे त्या महिलेशी नाते काय होते आणि त्या महिलेचा खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार याचा शोध नेरळ पोलीस घेत आहेत. तर सदर महिलेचे नातेवाईक तिच्या मूळ गावावरून आंध्र प्रदेश राज्यातून कर्जत पोलीस ठाण्यात आले आहेत.

अनोळखी महिलेचा मृतदेह प्रकरणी कर्जत पोलीस खुन्यापर्यंत पोहचले असून या तपस कार्याबद्दल हजिल्हा पोलिसांचे रोख बक्षीस आणि राज्य पोलीस महासंचालक यांच्या कडे या गुन्ह्याच्या तपासातील कार्याबद्दल पुरस्कार देण्याची शिफारस आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयाने केली असल्याची माहिती जिल्हा अप्पर पोलीस प्रमुख अभिजित शिवरकर यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close