शैक्षणिक

नंदलाल पाटील कापगते विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Spread the love

साकोली /प्रतिनिधी .
नंदलाल पाटील कापगते विद्यालयातील महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एम.सी.व्ही.सी. व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या बिल्डिंग मेंटेनन्स इयत्ता बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत कु. दीप्ती देवदास कंगाली हिने 72.50 टक्के गुण मिळवून तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केले तसेच कु. समीक्षा मेश्राम हिने 66.50 टक्के गुण घेऊन द्वितीय स्थान व कु. पूनम पिसाराम निखारे हिने 64.67 टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान मिळवून विद्यालयाचे नाव रोशन केले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विद्यार्थिनी ग्रामीण भागातील आहेत.
नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे विज्ञान, इलेक्ट्रिकल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल व कृषीशास्त्र अशा अनेक शाखांतून व्यवसाय शिक्षण देणारे जिल्ह्यातील अग्रगण्य कनिष्ठ महाविद्यालय आहे. दहावीनंतर पुढे अकरावी व बारावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी अनेक व्यवसायिक शाखामधून करियर घडविण्यासाठी एच.एस.सी. व्होकेशनल (एम.सी.व्ही.सी.) अभ्यासक्रमाची निवड करतात.
या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्या आर.बी. कापगते मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची अथक मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना बांधकाम देखभालीच्या क्षेत्रात चांगले करिअर करण्याची संधी मिळेल”.
बिल्डिंग मेंटेनन्स विभागाचे प्रमुख प्रा. के.जी.लोथे सर व प्रा. सी.जी.नागोसे सर यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या नेत्र दीपक यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.कापगते मॅडम, प्रा. के.जी.लोथे सर, प्रा. सी.एस. नागोसे, डी. एस. बोरकर, धनंजय तुमसरे, प्रा. सुनील कापगते, सौ मीना शिवणकर, प्रा. जी.जी. वाईकर, प्रा. पूजा तुमाने व इतर प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ, भेटवस्तू व पेढा भरवून सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close