क्राइम

फरीदाबाद रस्त्यावर ट्रॉलि बॅग मध्ये सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा  करण्यात पोलिसांना यश 

Spread the love

गुरुग्राम / नवप्रहार डेस्क

             गुरुग्राममधील सुशांत लोक परिसरात फरीदाबाद रस्त्यावर दोन मे रोजी ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एक हजार रुपयांच्या वादातून ही हत्या घडल्याचे तपासात समोर आले आहे. मृतक महिला ही  कॉल गर्ल असल्याचे समजत आहे.

   दोन तरूणांनी सिकंदरपूरमध्ये कॉल गर्लला आपल्या रूममध्ये बोलवले होते. एक हजार रूपयांवरून त्यांच्यात वाद झाला.रागाच्या भरात तरूणांनी तिची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून बॅगमध्ये भरले. त्यानंतर हत्या लपवण्यासाठी फरीदाबाद रोडवर बॅग फेकली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

गुरुग्राममधील सुशांत लोक परिसरात फरीदाबाद रस्त्यावर दोन मे रोजी ट्रॉली बॅगमध्ये ३३ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकराणानंतर एकच खळबळ उडाली होती. या हत्येचा गुरुग्राम पोलिसांनी पर्दाफाश केला. मृत महिलेची ओळख पार्विन उर्फ रिया अशी झाली, ती मूळ पश्चिम बंगालच्या पार्क सर्कस येथील राहणारी आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपी, दिनेश कुमार (22, मूळ उत्तर प्रदेश, रामपूर) आणि बिप्लव बिस्वास (26, मूळ उत्तराखंड, उधमसिंग नगर) यांना सिकंदरपूर येथून अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, दोन मे च्या रात्री दिनेशने पार्विनला सिकंदरपूर मेट्रो स्टेशनवरून घरी नेले. तिथे दोघांनी एकत्र मद्यपान केले. पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. त्यानंतर दिनेशने पार्विनचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बिप्लवच्या मदतीने त्याने मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये कोंबला अन् सेक्टर 44 च्या रस्त्यावर फेकला. दुसऱ्या दिवशी हा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली.

गुरूग्राम पोलिसांना सुरुवातीला या प्रकरणात कोणताही पुरावा मिळाला नाही. कारण घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पण सिकंदरपूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पुरावा मिळाला. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. पार्विनच्या डाव्या अंगठ्यावरील ८ टॅटू आणि इतर वैशिष्ट्यांमुळे तिची ओळख पटली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close