सामाजिक

अपघातग्रस्तांसाठी सुरेश बीजवे ठरले देवदूत 

Spread the love
वरुड / गौरव
             अपघातात जखमी तरुणांना आपल्या कार मध्ये वरुड येथे घेऊन येऊन त्यांच्यावर वरुड येथील शासकीय रुग्णालयात  प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर ला पाठवणाऱ्या सुरेश बीजवे  (जरूड) यांच्या कार्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
               उपलब्ध माहिती नुसार सुरेश बिजवे हे आपल्या कार मे मध्यप्रदेश येथे मजूर आणण्यासाठी जात असताना त्यांना सायंकाळी ५.३० वा. सुमारास  दोन तरुण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून दिसले. त्यांनी लगेच वाहन थांबवून त्यांना आपल्या कारमध्ये बसवून पहिले बेनोडा शहीद ठाणे आणि त्यांनतर वरुड च्या ग्रामीण रुग्णालयात आणले.
सुरेश बीजवे हे मध्यप्रदेश ला जात असताना  पांढरघाटी ते गहूबारसा मध्यप्रदेशातील रस्त्यावर सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार रविंद्र दयाराम कुमरे (३८) व शिवचरण छन्नू युवने (३२) गंभिर जखमी झाले. गंभिरावस्थेत दोघेही रस्त्यावर पडून होते. या जखमींच्या मदतीला कोणीच धावले नसताना सुरेश बीजवे हे देवदूत बनून आले. त्यांच्या या कार्याचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close