शैक्षणिक

शाळेचा प्रथम दिवस भावी जीवनाचा दिशादर्शक : प्रसाद देशमुख

Spread the love

शालेय प्रवेशोत्वांतर्गत शिवाजी शाळेत वृक्ष देऊन करण्यात आले विद्यार्थ्यांचे स्वागत

मोर्शी / संजय गारपावर
शालेय जीवनातील शाळेचा प्रथम दिवस हा विद्यार्थी भविष्याच्या दृष्टीने दिशादर्शक असून त्यादृष्टीने हा दिवस शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे मत शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख यांनी विद्यार्थी प्रवेशोत्सव अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना व्यक्त केले.विदर्भामध्ये नवीन शैक्षणिक सत्राला 30 जून पासून प्रारंभ झाला असून संपूर्ण मोर्शी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला.त्याअनुषंगाने तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या अशा शिवाजी शाळेत शालेय प्रवेशोत्सवांतर्गत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने वृक्ष,पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रसाद देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी नितीन उंडे,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य एन.एस.गावंडे,डी.एच.अर्डक,शालेय पोषण आहार अधिक्षका प्रज्ञा भवरे,पालक प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती दिनेश मानकर,प्रा.डॉ.संदीप राऊत,सौ.डेहनकर,सौ.पाचरे,सौ.सुवर्णा लुंगे,अरुण झटाले,शिप्ट इंचार्ज मनोज देशमुख,एनसीसी ऑफिसर श्रीकांत देशमुख,अशोक चौधरी,डॉ.एस.एन.हेडाऊ,विशाखा ठाकरे,राजेश मुंगसे,दिनेश सुखदेव उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थी व पालकांच्या समस्या व सूचना समजावून घेवून त्याचे निरसन करण्याचे आश्वासन शाळेच्या वतीने देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा नवरे प्रास्ताविक एस.आर.ठाकरे तर आभार अजय हिवसे यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close