Uncategorized

आंदरपास जवळ सापडलेल्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना यश 

Spread the love
अकोला /विशेष प्रतिनिधी

                     अकोला जिह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन च्या हद्दीतील बोदरखेड शिवारात अंडरपास जवळ सापडलेल्या मृतदेहाच्या मारेकऱ्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतक तरुण आणि खुनी दोन्ही यवतमाळ येथील असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपीला मृतकाचे आपल्या पत्नी सोबत अनैतिक सबंध असल्याचा संशय होता आणि त्यातून ही हत्याकांड घडले आहे.

 बोदरखेड शेतशिवारातील रेल्वे अंडरपासमध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (ता.२२) आढळून आला होता. मृतदेहावरील अंगात फक्त पॅन्ट होती, तर टी-शर्ट गळ्याभोवती गुंडाळलेला होता. तसेच चेहरा दगडाने ठेचलेला असल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने गुन्ह्याचा उलगडा करून मृतकाची ओळख पटविण्याचे आणि आरोपीला अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना दिले होते. तपासादरम्यान अकोला व शेजारील जिल्ह्यांतील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ येथील विक्की उर्फ बबलू भेंडे हा २१ मेच्या रात्रीपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर अवधूतवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तपास केला असता मृतकाची ओळख विक्की उर्फ बबलू राजू भेंडे (वय १९, रा. गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ) अशी पटली.

मृतकाच्या ओळखीच्या व्यक्तींबाबत चौकशी केली असता त्याचा शेजारी युवराज शंकर तांगडे (वय ४१, रा. गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ) याच्याशी वाद झाल्याची माहिती मिळाली. यवतमाळ पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, विष्णु बोडखे, दशरथ बोरकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

१२ तासांत आरोपीला बेड्या

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मृतकाची ओळख पटवून संशयीत आरोपीला १२ तासांत बेड्या ठोकल्या. चौकशीत आरोपी युवराज तांगडे याने आपल्या पत्नीशी मृतकाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून विक्की भेंडे याची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी बोरगाव मंजू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close