उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टर ने केला बलात्कार

गुंगीचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्याचा आरोप
लखनऊ / विशेष प्रतिनिधी
उपचारासाठी डॉक्टर कडे आलेल्या तरुणीवर डॉक्टर कडून गुंगीचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्याचा आरोप २० वर्षीय रुग्ण तरुणीने केला आहे. यानंतर पोलिसांनी डॉक्टर का बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टर ने ऑपरेशन थिएटर मध्ये गुंगीचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सबंधित डॉक्टरच्या दवाखान्याला कुलूप लावले असून त्याचा परवाना रद्द केला आहे.
लखनौमधील इंदौराबाग येथील एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी डॉ. विजय कुमार गिरी याला बेड्या ठोकल्या आहेत. सरकारच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने डॉ. विजय कुमार गिरी याचे लायसन्स रद्द केले आहे. त्याशिवाय रूग्णालयालाही कुलूप लावले आहे.
२० वर्षाची तरूणी अपस्मारच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाली होती. २१ मे रोजी आरोपी विजय कुमार गिरी याने ऑपरेशन थिएटरमध्ये विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितलं, त्यानंतर तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, १९ मे रोजी तिला अपस्मारच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. २१ मे रोजी दुपारी ३ वाजता मुलीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉ. गिरी यांनी ऑक्सिजन देण्याच्या बहाण्याने तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.
सुरुवातीला रुग्णाची मोठी बहीण आणि एक नर्स ऑपरेशन थिअटरमध्ये होत्या. पण काही मिनिटांनंतर डॉक्टरांनी त्या दोघींना बाहेर पाठवले. त्यानंतर डॉक्टरने तिच्या हाताला लावलेल्या इंट्राव्हेनस कॅन्युलाद्वारे मुलीला भूल देणारे इंजेक्शन दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर बलात्कार केला, असा आरोप कुटुंबियांनी केला.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, काही वेळाने तिला अर्धवट शुद्ध आली आणि डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत ती रडत रडत ऑपरेशन थिअटरमधून बाहेर पळाली. पोलिसांनी सांगितले की पीडितेने तिच्या प्रकृतीमुळे काही वर्षे शाळा सोडली होती आणि ती सध्या इयत्ता १२वी मध्ये शिकत होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दखल घेतली आणि रुग्णालय व डॉक्टर यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.




