आता असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – सुवेंदु अधिकारी

अशा प्रकारची अशांतता, गुन्हेगारीकरण,राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी घडामोडी अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. आम्ही अशा गोष्टी खपवून घेणार नाही असं सीएम सुवेंदू अधिकारी यांनी सांगितलं. जमाव चिथावणी देत असूनही संयम दाखवल्याबद्दल त्यांनी पोलीस आणि केंद्रीय पथकांचं कौतुक केलं. “मी जखमी पोलीस आणि सीआरपीएफ जवानांना भेटायला आलो आहे. काल आमच्या सगळ्या फोर्सने कायदा-सुव्यवस्था राखली. एक मोठी अप्रिय घटना टाळून लोकांची रक्षा केली. मी त्यांना हे सांगायला आलोय की, सरकार मजबुतीने तुमच्यासोबत उभं आहे” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.
ते दिवस आता गेले
त्यांनी आधीच्या तृणमुल काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. “पोलीस खात्याशी संबंधित मंत्री एसी रुममध्ये बसून असायचे आणि पोलीस जखमी व्हायचे ते दिवस आता गेले. पोलीस खात्यावर आधी काही बंधनं होती. ते जुने नियम आता लागू होतात असा विचार करु नका. कोणाला असं वाटतं असेल की, पोलीस खात्याचे हात-पाय बांधलेले आहेत, तर तो त्यांचा गैरसमज आहे” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.




