डीएनए रिपोर्ट आणि चार वर्षापासून मनोरुग्णालयात असलेल्या महिलेला दिलासा

कल्याण /क्राईम रिपोर्टर
ती सतत तिचा पती जीवनात असल्याचे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होती.पण तिच्या पतीशी संगनमत या असलेल्या पोलिसांनी तिचे काही एक एकूण न घेता तिला मनोरुग्ण ठरवत सरळ तिची रवानगी मनोरुग्णालयात केली. तिने चार वर्ष त्याठिकाणी काढले. पण जेव्हा RTI आणि DNA रिपोर्ट मधून सत्य बाहेर आले तेव्हा मात्र कथित रित्या मेलेला तिचा पती आणि पोलिसांचे पितळ उघडे पडले. एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या कथानकाला मागे टाकेल असा प्रकार कल्याण येथे घडला आहे.
तक्रार देण्यासाठी गेली अन् स्वतःच अडकली
या धक्कादायक घटनेची सुरुवात सप्टेंबर २०२२ मध्ये झाली. कल्याण येथील नम्रता (नाव बदललेले) या आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी नवघर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता उलट त्यांच्याशी वाद घातला आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण केली.
यानंतर १९ सप्टेंबर रोजी पती घर सोडून गेल्याची तक्रार नम्रता यांनी दिली. परंतु, त्यानंतरच्या घडामोडी चक्रावून टाकणाऱ्या होत्या. पोलिसांच्या दाव्यानुसार, तक्रारीच्या दुसऱ्याच दिवशी खाडीत एका पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह नम्रता यांना दाखवण्यात आला नाही, तर पतीच्या भावानेच हा मृतदेह आपल्या भावाचा असल्याचे सांगत ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी नम्रता यांच्यावरच पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
पती जिवंतचा दावा अन् वेडी ठरवून मनोरुग्णालयात रवानगी
खाडीत सापडलेला मृतदेह पतीचा नाहीच आणि पती जिवंत असून अनेकांनी त्याला पाहिले आहे, असा टाओ नम्रता वारंवार मारत होत्या. मात्र, पोलिसांनी आणि सासरच्या लोकांनी त्यांच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत त्यांना ‘मानसिकदृष्ट्या आजारी’ ठरवले आणि थेट मनोरुग्णालयात पाठवून दिले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पतीच्या भावाचे आणि मुलाचे डीएनए (DNA) नमुने घेण्यात आले होते, परंतु त्याचा अहवाल नम्रता यांच्यापासून लपवून ठेवण्यात आला.
RTI मधून DNA अहवाल समोर अन् मोठा खुलासा!
मनोरुग्णालयातून परत आल्यानंतर नम्रता यांनी डीएनए अहवालाची सातत्याने मागणी केली. मात्र, प्रशासन अहवाल देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी थेट माहितीच्या अधिकाराचा (RTI) वापर केला. तब्बल ४ वर्षांनंतर हाती आलेल्या या डीएनए अहवालाने सर्वांचेच धाबे दणाणले. अहवालात स्पष्ट नमूद होते की, खाडीत सापडलेला तो मृतदेह नम्रता यांच्या पतीचा नव्हताच! या खुलाशाने नम्रता यांचा दावा खरा ठरला असून पतीने पोलिसांच्या मदतीने हा संपूर्ण कट रचल्याचे उघड झाले आहे. यानंतर नम्रता यांनी न्यायालयात धाव घेतली असून फरार पती, त्याचा भाऊ, वहिनी आणि या कटात साथ देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




