रेती चोरी करणाऱ्या आरोपीला अटक पोलीस स्टेशन भिवापूर यांची कारवाई
नागपूर / अमित वानखडे
पो.स्टे. भिवापूर :- अंतर्गत १०० मी अंतरावरील पो.स्टे. भिवापुर टी पॉईट येथे दिनांक २२/०५/२०२३ चे ०५/४५ वा. दरम्यान फिर्यादी हे पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन भिवापूर टी पॉईंट येथुन काही इसम रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरून नाकाबंदी केली असता यातील आरोपी नामे- संजय पतिराम रणदिवे, वय ३४ वर्ष, रा. नवेगाव बांध ता. मोरगाव अजुर्नि जि. गोदिया याने त्याचे ताब्यातील टिप्पर वाहन क्र. एम एच – ४० / बि.जी- ६३८८ मध्ये ०६ ब्रास रेती किंमती तीस हजार रूपये तसेच १० चाकी टिप्पर क्रमांक एम. एच. ४० बि.जी- ६३८८ किंमती वीस लाख रूपये असा एकुण वीस लाख तीस हजार रूपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विना परवाना चोरी करून वाहतुक करतांना वाहतुक करतांना मिळुन आल्याने वाहनासह असा एकुण २०,३०,००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी सरतर्फे पोहवा / १३९५ राकेश छेदीलाल त्रिपाठी पोस्टे भिवापूर येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. भस्मे पोस्टे भिवापूर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार जयपालसिंग गिरासे, पोलीस हवालदार राकेश त्रिपाठी, पोशि/ ब. नं. २३७० अजय झाडे यांनी केली.