पाच मुलाची आई असलेल्या सासूचे जावयावर जडले प्रेम,कुटुंबाच्या विरोधानंतरही ती निर्णयावर ठाम

मैनपुरी / विशेष प्रतिनिधी
प्रेमात जात पात, गरीब श्रीमंत , आणि लहान मोठे वय हे पाहिले जात नाही. दोघांचे एकमेकांवर प्रेम असले की मग त्यांना जवळचे लोकं आणि त्यांची समजूत घालणारे सगळ्यात मोठे शत्रू वाटू लागतात. म्हणूनच हिंदीत एक म्हण आहे. ‘ दिल आया मेंढक पर तो परी क्या चीज है ‘ असाच प्रकार उत्तरप्रदेश च्या मैनपुरी येथून समोर आली आहे.
मुलांनी विरोध केल्यानंतरही महिला जावायसोबत राहण्यावर ठाम असल्याने हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि तिच्या जावयामधील जवळीक वाढल्याची माहिती जेव्हा महिलेच्या मुलांना समजले, तेव्हा त्यांनी सासू आणि जावायाच्या एकत्र राहण्याच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. पाच मुलांची आई असलेल्या या महिलेच्या या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला. परंतु, महिला आपल्या निर्णयावर ठाम राहिली. दरम्यान, परिस्थिती बिघडल्याची माहिती मिळताच खरगजीत नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी खरगजीत नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी कुटुंबातील सदस्य आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. महिला आणि तिच्या जावयामधील संबंधांचे नेमके स्वरूप काय आहे आणि कुटुंबाच्या आरोपांमागील सत्य काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पोलीस सर्वांचे जबाब नोंदवून घेत असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे.
अलिगडमधील जुन्या घटनेची आठवण
मैनपुरीतील या घटनेमुळे अलिगडमधील एका जुन्या प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. तेथे एका मुलीच्या लग्नापूर्वी तिच्या आईचे होणाऱ्या जावयावर प्रेम जडले होते. त्यानंतर ती महिला घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन होणाऱ्या जावयासोबत निघून गेली होती. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला असता, दोन्ही व्यक्ती सज्ञान असल्याने महिलेने आपल्या मर्जीने राहण्याचा निर्णय घेतला होता आणि ते नंतर बिहारमध्ये राहू लागले होते.


