अजब गजब
ननदेची एक अट आणि नवरदेवाला जावे लागले रिकाम्या हाताने परत


मथुरा / विशेष प्रतिनिधी
नवरदेवाची बहिण आणि जावई म्हटले की त्यांचा एक वेगळाच जलवा असतो. भावाच्या लग्नात आलेल्या बहिणीने आपल्या आणि नवऱ्यासाठी वेगळी खोली मागितल्याने वर आणि वधू पक्षात झालेल्या वादाने भयंकर रूप घेतल्याने हा वाद पोलिस स्टेशन पर्यंत पोहचला. आणि वर पक्षाला नवरी विना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
मिळालेल्या माहिती नुसार लक्ष्मी नगरहून ही वरात मांट येथील राया रोडवर आली होती. सुरुवातीला सर्व काही आनंदाने सुरू होते. वधू-वर फोटोशूटमध्ये व्यस्त असतानाच, नवरदेवाच्या बहिणीने हॉटेलमध्ये स्वतःसाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी केली. याच कारणावरून वधू आणि वर पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. हा वाद इतका विकोपाला गेला की, नवरदेवाची बहीण आपल्या पतीसह रागाने लग्न सोहळा सोडून निघून गेली.
बहीण आणि दाजी लग्नातून निघून गेल्याचे पाहून नवरदेव संतापला. त्याने “बहीण आणि दाजी परत येत नाहीत, तोपर्यंत मी फेरे घेणार नाही,” अशी आडमुठी भूमिका घेतली. शनिवारी मध्यरात्री सुरू झालेला हा ड्रामा रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होता. नातेवाईकांनी नवरदेवाची खूप समजूत काढली, पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
रविवारी सकाळी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले. तिथे अनेक तास चर्चा झाली, मात्र नवरदेव किंवा त्याचे कुटुंब नमते घेण्यास तयार नव्हते. अखेर, पोलीस उपस्थितीत दोन्ही बाजूंनी लग्नाचा झालेला खर्च एकमेकांना परत देण्याचे मान्य केले आणि हे लग्न मोडल्याचे जाहीर करण्यात आले.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



