क्राइम

कला केंद्रावर गोळीबार ,युवक जखमी 

Spread the love

नारायणगाव / विशेष प्रतिनिधी 

                            पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या आणि कांदळी ग्राम पंचायत हद्दीत येत असलेल्या कला केंद्रावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एका तरुणाच्या कंबरेत गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. 

 चाकण येथील तरुणाने गोळीबार केल्याने ओतुर येथील फिरोज कादिर शेख(वय 31) हा तरुण जखमी झाला असून जखमीला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

कला केंद्राच्या प्रवेशद्वारा जवळ चाकण येथील चार तरुणांपैकी एका तरुणांने पिस्तुला मधून जमिनीवर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी घटनास्थळी उभे असलेल्या ओतूर येथील तरुणाच्या कमरेला घासून गेली.

याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला आळेफाटा येथे खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

गोळीबार करणाऱ्या चाकण येथील तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक चाकण येथे पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत असून घटनेची माहिती घेत आहेत. येथील कला केंद्रावर नेहमीच वाद होत असतात. शासनाने दिलेले नियम धाब्यावर बसवून कला केंद्र उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिक देत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close