राष्ट्रीय

अभिजीत दीपके यांच्या विरोधात मोठी मागणी, पहा काय आहे मागणी 

Spread the love
अभिजीत दीपके यांच्या विरोधात मोठी मागणी, पहा काय आहे मागणी 
छत्रपती संभाजी नगर / प्रतिनिधी 
         जंतरमंतर वर CJP कडून NEET पेपर फुटी प्रकरणा नंतर केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर केंद्रीय नेतृत्वाला धर्मंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. यानंतर दिपके यांचे राजकीय आणि सामाजिक वजन वाढले आहे. अश्यातच दिपके यांनी पोलिसांबद्दल केलेल्या विधानामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस बॉईज असोसिएशन मैदानात उतरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासोबतच संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलीस संरक्षण हटवले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केल्यानंतर दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले आहेत. त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीबाबत बैठका सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते तसेच नागरिक त्यांच्या निवासस्थानी येत असल्याने तेथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तावरून दीपके आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचा दावा करण्यात आला. आपल्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून अडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच पोलिसांकडून उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपके एका पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या विभागाची तसेच पदाची माहिती विचारताना दिसत असल्याचे सांगितले जाते. नागरिकांना कोणाला भेटायचे आणि कोणाला भेटू द्यायचे, याबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर आता पोलीस संघटनेने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एका बाजूला दीपके यांनी पोलिसांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे पोलीस संघटनेने त्यांच्यावरच कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणाचा मुद्दा आता नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close