क्राइम

खळबळजनक ….बालक आणि तरुणांवर लैंगिक अत्याचार

Spread the love
आरोपीला अटक, अत्याचारग्रस्तांचा आकडा २०० च्या वर
 
नंदुरबार / विशेष प्रतिनिधी 
               नंदुरबार शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीकडून २०० बालक आणि तरुणांचे लैंगिक शोषण करण्यात आले असून  त्यांना ब्लॅकमेल देखील करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे.
या प्रकरणी चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने अश्लील व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पीडितांना ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

बालक आणि युवकांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार २०२२ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे. संशयित बालक आणि युवकांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानुसार शहरातील भोणे फाटा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी किती बालक व युवक पीडित आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली आहे.

आरोपी मुलांना जाळ्यात नेमकं कसं फसवायचा?

नंदुरबार शहरातल्या रायसिंगपुरा भागातील आरोपी काही मुलांना पैशांच्याआषिषानं जवळ करायचा. नंतर त्यांच्यावर अत्याचार करत. याबाबत आलेल्या तक्रारीनुसार ६ ऑगस्ट रोजी आरोपीनं एका अल्पवयीन मुलाला पपईच्या शेतात भेटण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्याआधीच त्या भागात साध्या वेशात पोलीस नजर ठेवून होते. आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.

लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं

आरोपीच्या मोबाईलमधल्या व्हिडिओंची पडताळणी करून पोलिसांनी पीडितांची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं आहे. आरोपीजवळ असलेल्या मोबाईल, लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जप्त साहित्याच्या तपासणीनंतर व्हिडीओ आणि फोटोची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांची छाननी सुरु आहे.

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पालकांनी आपापल्या मुलांची काळजी घ्यावी. मुलांशी नेहमी संवाद ठेवावा, अशी मागणी केली जात आह.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close