क्राइम

डॉक्टरांना सांगितले अपघात , डॉक्टरांनी सिटी स्कॅन करताच पायाखालची जमीन सरकली 

Spread the love

कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी 

                      19 वर्षीय तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांना तरुण दुचाकी वरून पडल्याने जखमी झाल्याचे सांगण्यात आले. डोक्यातून रक्त येत असल्याने डॉक्टरांनी सिटीस्कॅन करायचा निर्णय घेतला. आणि सिटीस्कॅन रिपोर्ट पाहताच डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. घटना कोल्हापुरातील कबनूर-रुई हद्दी परिसरात  घडली आहे.

कानामागून आलेली बंदुकीची गोळी थेट तरुणाच्या डोक्यात घुसली आणि त्यामुळे नीलेश निशिकांत कांबळे (वय 19, रा. महात्मा फुलेनगर, कबनूर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश कांबळे हा तरुण कबनुरमधील फुलेनगर परिसरात वास्तव्यास आहे त्याला जखमी अवस्थेत सायंकाळच्या वेळी दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा तो दुचाकीवरून पडल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावली आणि त्याला तातडीने कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.

सीपीआरमध्ये डॉक्टरांनी तातडीने सिटी स्कॅन केले. तेव्हा धक्कादायक बाब पुढे आली. उजव्या कानाच्या वरच्या भागात बंदुकीची गोळी आढळून आली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. याप्रकरणी शुभम दीपक सूर्यवंशी याला ताब्यात घेण्यात आले आहे. कानामागून आलेली गोळी त्याच्या डोक्यात घुसल्याची माहिती असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close