विशेष

नामांकित आयटी कम्पनीत सुरु असलेला लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा खेळ पोलिसांनी केला उघड

Spread the love

वेशांतर करून केली या प्रकरणाची पोलखोल

नाशिक / विशेष प्रतिनिधी

            लिंगपिसाट अशोक खरात आणि रवींद्र एरंडे यांच्या करामती मुळे प्रकाश झोतात आलेल्या नाशिक  आणखी एक हादरवणारे प्रकरण समोर आले आहे. येथील एका नामांकित आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा खेळ सुरू होता. पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेशांतर करून हा अनैतिक प्रकार उघडकीस आणला आहे.

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्याने नाशिक पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली. संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळताच, महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सात महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने कंपनीत वेशांतर करून प्रवेश केला.

या पथकाने प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. मीटिंग दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले. तसेच, सुमारे 40 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य केले जायचे. ‘माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली’ असे सांगून महिलांवर उपकाराचे ओझे टाकले जायचे. एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. केवळ महिलांचे शोषणच नाही, तर एका तरुण पुरुष कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचे उघड झाले आहे. कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात होते.

पाच जणांना अटक; 10 एप्रिलपर्यंत कोठडी

या प्रकरणात आतापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या रॅकेटमधील पाच मुख्य संशयितांना अटक केली आहे

1. आसिफ अन्सारी , 2. शफी शेख ,3. शाहरुख कुरेशी ,4. रझा मेमन,5. तौसिफ अत्तार अशी त्यांची नावे आहेतन्यायालयाने या पाचही आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close