हटके

अन् तो बायकोला टाकून दुचाकी दामटत निघून गेला

Spread the love

                        काही गोष्टी जर सोडल्या तर सोशल मिडिया नॉलेज मध्ये भर घालण्यासोबत मनोरंजनाचे साधन देखील ठरत आहे. मनुष्य हा विसरभोळा असतोच. प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्ट लक्षात राहील असे नाही. काही लोक इतके विसरभोळे असतात की ते ज्या कामासाठी बाहेर पडले असतात ते न करताच परत येतात. यावर कुटुंबीय मिस्किल पणे बघ एखाद्या दिवशी बायकोला बाजारात घेऊन गेला तर तिला विसरू नको असे बोलतात. पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. येथे एक व्यक्ती दुचाकीवरून बायकोला आणत असताना ती एका ठिकाणी उतरली आणि तो तिला सोडून तसाच निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्याला अनेकांनी आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो पुढे निघून गेला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी सुरु आहे. लहान मोठ्या-गाड्या येजा करत आहेतय याच वेळी एका बाईकवर एक व्यक्ती आपल्या बायको आणि मुलासोबत चालला आहे. दरम्यान अचानक एक मोठा ट्रक येतो ज्यामुळे व्यक्तीचा बॅलेन्स बिघडतो आणि बाईक थांबवतो. यावेळी बायोक गाडीवरुन खाली उतरते. पण नवरा तसाच गाजी घेऊन पुढे जातो. बायको आणि आसपासचे लोक त्याला आवाज देत असतात पण तो थांबत नाही. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @terakyalenadena या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संकटापासून दूर जाण्याचा मार्ग थोडा सामान्य आहे असले म्हटले आहे. अनेकांनी यावर मजेशीर अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका युजरने ‘ तो नक्की पिलेला असणार’ असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने पठ्ठ्या घरी जाऊन मार खाणार असे म्हटले आहे. आणखी एका युजरने त्याचे पोरग पण त्रासलेय असे म्हटले आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close