हटके

बिबट्याची फजिती ! तेल गेले तूप ही गेले, हाती……

Spread the love
            सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात जंगली प्राण्यांचे देखील असतात. अनेक वेळा यात वाघ ,सिंह, बिबट या सारख्या प्राण्यांना मोठ्या शिताफीने शिकार करताना दाखवल्या जाते. तर  काही वेळा हे प्राणी शिकारीत निपुण असतांना देखील यांच्या टप्प्यात आलेली शिकार यांच्या हातून निसटून जाते. काही वेळा हे प्राणी एक शिकार करून दुसऱ्याच्या मागे लागतात. असेच या प्रकरणात घडले आहे. दुसऱ्या शिकारीच्या मागे लागून बिबट्याने पाहिली शिकार ही गमावली. म्हणजेच बिबट्याच्या हातून ‘ तेल गेले, तूप ही गेले आणि हाती…. ‘ अशी त्याची परिस्थिती झाली .
 प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या डुक्कराची त्याचा मित्र कशी सुटका करतो हे पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून दोन डुक्कराची पिल्ले जात असून यावेळी अचानक तिथे बिबट्या येतो आणि त्यातील एका डुकराला आपल्या जबड्यात पकडतो. आपल्या मित्राला बिबट्याने पकडलेलं पाहून दुसरे डुक्कर तिथून पळून न जाता त्याच्याकडे पाहत उभा राहतो. यावेळी अचानक बिबट्या जबड्यात पकडलेले डुक्कर मरण पावले असे समजून त्याला सोडून दुसऱ्या डुकराच्या पाठीमागे धावतो. पण, यावेळी बिबट्याची फजिती होते. ते दोन्ही डुक्करं खूप दूर पळून जातात, त्यामुळे बिबट्याच्या हाती काहीच लागत नाही. या व्हिडीओतून एका डुकराने दुसऱ्या डुकराला वाचवण्यासाठी वापरलेल्या युक्तीचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close