विशेष

प्रकरण मागे घेण्यासाठी मृतकाच्या भावाला ‘ ऑफर ‘  ? 

Spread the love

प्रकरण मागे घेण्यासाठी मृतकाच्या भावाला ‘ ऑफर ‘  ? 

सख्खा भाऊ देखील पैश्याच्या लोभात पडण्याची शक्यता  ? 
कुटुंब लालची असल्याची आणि काही दिवसांपूर्वीच मृतका कडून हक्कसोड लेख घेतल्याची चर्चा
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी 
              ‘ मरणाने केली सुटका जीवणाने छळले होते ‘ असे म्हटल्या जाते. पण काही लोक खुपच भाग्यहीन असतात. त्यांच्या मागील भोग मरणानंतरही सुटत नाही. अगदी असाच प्रकार कथित अवैध विजेच्या धक्क्याचा बळी ठरलेल्या गोपाल  सोबत घडला आहे.
                         मागच्या आठवड्यात सोनोरा काकडे शिवारात आष्टा येथील गोपाल मधुकर राऊत याचा कथित शेत कुंपणात सोडलेल्या अवैध प्रवाहामुळे मृत्यु झाला असल्याची नागरिकांत चर्चा आहे. सदरचे शेत हे अनुप देविदास मानकर यांच्या मालकीचे असल्याचे कळते.
प्रकरणात सेटलमेंट सुरु असल्याची चर्चा – नागरिकांत सुरू असलेल्या चर्चेनुसार  मृतकाचे नातेवाईक आणि ज्याच्या शेतात ही घटना घडली त्यांच्यात सेटलमेंट सुरू असल्याचे देखील बोलल्या जात आहे. अत्यंत गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शेतमालक 10 ते 15 लाख रु. देण्याच्या मनस्थितीत आहे तर मृतकाचे नातेवाईक 30 लाख रु.किंवा 5 एकर शेती मागत असल्याचे बोलल्या जात आहे.
कुटुंब लालची असल्याची आणि काही दिवसांपूर्वीच हक्कसोड लेख घेतल्याची चर्चा – नागरिकांत सुरू असलेल्या चर्चेनुसार मृतक हा अवलिया टाईप होता.त्याला संपत्तीशी काही देणे घेणे नव्हते. तो आपल्याच मस्तीत खुश असायचा असे असतांना देखील मृतक गोपाल कॅग्या कुटुंबीयांनी त्याच्या कडून संपत्तीत हक्कसोड लेख लिहून घेतला होता अशी गावात  सर्वदूर चर्चा आहे.
1- 2 दिवसात शवविच्छेदन अहवाल येण्याची शक्यता-  घटनेला जवळपास 8-10 दिवसांचा अवधी लोटला आहे. त्यामुळे 1- 2 दिवसात पोस्टमार्टेम अहवाल येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतरच तपासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल काय येतो
मंगरूळ येथील एक प्रशासकीय अधिकारी प्रकरणात जास्त रस घेत असल्याची चर्चा – या प्रकरणात सेटलमेंट साठी मंगरूळ येथील एक अधिकरी जास्त रस घेत असल्याची चर्चा पंचक्रोशीत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close