शेगाव येथील होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय बारी समाजाच्या तीन मागण्यांचे उपमुख्यमंत्र्यांनकडून आश्वासन
* आमदार संजय कुटे यांनी केला विधानसभेत प्रश्न उपस्थित
*. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार अधिवेशन
अंजनगाव सूर्जी,. मनोहर मुरकुटे
अखिल भारतीय बारी महासंघ व समस्त बारी समाजाचे वतीने गेली एक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी समाज बांधवांसोबत समाजा प्रति असलेल्या समस्यांबाबत बैठकांचे नियोजन करण्यात आले होते
ह्यामध्ये आगामी काळात अखिल भारतीय बारी समाजाची राजकीय सामाजिक क्षेत्रात उन्नती व्हावी ह्या उद्देशाने नुकतीच अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी घोलप यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत शेगाव येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती, ह्यामध्ये बारी समाजाचे दैवत संत श्री रुपलाल महाराज यांना राष्ट्रसंत दर्जा मिळावा व शासनदरबारी नोंद व्हावी, तसेच अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रुपलाल महाराज यांचे कर्म भूमीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे तसेच संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या समाजाला राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्थान असावे, तर बारी समाजाला आर्थिक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात समाज विकासाच्या हेतूने अखिल भारतीय बारी समाज आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषित करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच विदर्भातील प्रमुख पीक पानपिंपरी वनौषधी पिक, पानवेली ह्या पिकाला अनुदान व त्यासाठी संशोधन केंद्र व प्रक्रिया केंद्र स्थापित करावे, तसेच आगामी काळात समाजाला विधानसभा, लोकसभा ह्या मध्ये बारी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, तसेच राष्ट्रसंत श्री संत रूपलाल महाराज यांची जयंती व पुण्यतिथी ही शासकीय स्तरावर नोंद करून ती साजरी व्हावी व इतरही काही प्रमुख मागण्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करून आगामी 1 ऑक्टोंबर 2023 ला श्री संत शेगाव नगरीत राज्याचे मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री व इतरही प्रमुख मान्यवरांचे उपस्थित अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय महा अधिवेशन होणार आहे
ह्या संबंधी मुद्देसूद नियोजन बैठक समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली , याबाबत दिनांक दिनांक एक ऑगस्ट ला माननीय रमेश जी घोलप यांनी आमदार संजय कुटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सदरच्या अधिवेशनाबाबत व समाजाप्रती असलेल्या मागण्यांचे बाबत सविस्तर चर्चा करून माननीय आमदार संजयजी कुटे यांना अवगत केले त्यानुसार आमदार कुटे यांनी मी आगामी अधिवेशनात तुमच्या प्रश्नाविषयी सविस्तर मुद्दे सुद चर्चा घडवून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यास सरकारला बाध्य करण्याची ग्वाही देतो असे आश्वासन दिले असता नुकतीच दिनांक ३ ऑगस्टला माननीय आमदार संजय कुटे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून बारी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले असता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सदरच्या प्रश्नांबाबत गंभीरतेने घेऊन बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ , राष्ट्रसंत रुपलाल महाराज यांना राष्ट्रसंताचा दर्जा व राष्ट्रीय स्मारकासाठी जागेची उपलब्धता अश्या तीन मागण्यांबाबत त्वरित अंमलबजावणीचे आश्वासन दिले त्यावरून समाज बांधव माननीय आमदार संजय कु टे यांचे व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे बारी समाजाने आभार मानले परंतु येणाऱ्या अधिवेशना पर्यंत सदरच्या मागण्यांबाबत सरकार आगामी काळात काय भूमिका घेणार व दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार, व इतरही उर्वरित प्रश्नांबाबत बाबत शासन काय कार्यवाही करणार याकडे सर्व समाज बांधवांचे लक्ष लागले आहे