सामाजिक

फिलिपाईन्स येथील शिकाऊ विमाना च्या दुर्घटनेत मोर्शीच्या शिकाऊ पायलटचा मृत्यू

Spread the love

 

मोर्शी (संजय गारपवार)
शहरातील राधाकृष्ण कॉलनी येथील २० वर्षीय युवकाचा फिलिपाइन्समध्ये शिकाऊ विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
राधाकृष्ण कॉलनी येथे राहणारा अंशुम राजकुमार कोंडे वय 20 हा फिलिपिन्स येथे पायलट म्हणून प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षणा दरम्यान फिलिपिनो पायलट एडझेल जॉन लुम्बाओ ताबुझो आणि मोर्शी येथील अंशुम राजकुमार कोंडे हा टू सीटर इको एअर सेसना 152 या लहान विमानाने शिक्षण घेत असताना ते विमान मंगळवारी दुपारी बेपत्ता झाले. या दुर्घटने नंतर अपायाओ प्रांतात बुधवारी या दुर्घटनाग्रस्त विमानाचा व दोन्ही वैमानकांचा मृत्यू झाला असल्याची तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मंगळवारपासून या अपघातग्रस्त विमानाचा तपास तेथील यंत्रणा करीत होती आज या विमानाचा शोध लागला असून तशी माहिती अंशुम याचे वडील राजकुमार कोंडे यांना संबंधित विभागाकडून देण्यात आली.
अंशुम याने श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालया मधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याची पायलट व्हायची पूर्वीपासूनच इच्छा असल्याचे त्याचे वडिलांनी सांगितले.
तो 20 एप्रिल रोजी मोर्शीला आला होता व तीच त्याच्या नातलगा सोबत ची शेवटची भेट ठरली.
अंशुम याच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
त्याच्या पश्चात आई वडील,दोन बहिणी, एक भाऊ असा मोठा परिवार आहे. एका कर्तबगार तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close