शेती विषयक

अवकाळीचा कापसाला फटका तर तुर, हरभऱ्यासाठी वरदान

Spread the love

पावसामुळे शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

अंजनगांवसुर्जी, मनोहर मुरकुटे

अंजनगाव सुर्जी तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसाचा कपाशीला फटका बसला आहे. तर झालेला पाऊस तुर व हरभऱ्यासाठी नवसंजवनी ठरणार असल्या कृषि विभागातर्फे सांगण्यात आले असले तरी तालुक्यात कपाशी वेचणीचा हंगाम सुरु असुन मजुर टंचाईमुळे बहुतेक शेतातील कापुस भिजला व लोंबकळुन जमीनदोस्त झाल्याने ज्या शेतकऱ्यांचे मजुर टंचाई मुळे कापसाचा वेचा झाला नाही,त्याना मात्र या अवकाळीचा फटका बसलेला आहे. तालुक्यातील सहा मंडळात दि.२७व२८ या दोन दिवसात सरासरी ५०.८ मि.मि.ची नोंद झालेली असुन अंजनगांवसुर्जी मंडळात४६.५,भंडारज ४९.५,सातेगाव३४.१,कापुसतळणी ५४.५,कोकर्डा ४९.६तर विहीगांव मंडळात सर्वाधीक ७०.५ मि.मी.पावसाची नोंद झाली असुन,झालेल्या पावसाने काही शेतकरी सुखावले तर काही दुखावले असल्याचे पाहण्यात येत आहे,सदर अवकाळी पाऊस कोरडवाहू कास्तकारांकरिता चांगला ठरला, मात्र ज्यांनी कपाशी, तुरीला ओलीत केले त्यांना हा अवकाळी पाऊस काळ ठरण्याची चिन्हे आहेत, तुर व कपाशीचा माल खालच्या ओलीताच्या व झालेल्या पावसाने ओल अतीझाल्यामुळे गळणार, परंतु ही दीर्घ मुदतीचे पिके असल्याने नवीन पात्या,फुले येवुन त्यांची भरपाई होईल असा कृषी खात्या मार्फत कयास वर्तवन्यात आलाअसुन रब्बी हंगामातील गहु, कांदा,हरबरा या पिका पैकी ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहु हरबरा पेरणी केली त्यांना हा अवकाळी पाऊस नवसंजवनी ठरणार आहे,परंतु ज्यां शेतकऱ्यांनी शेत भिजवुन हरबऱ्याची पेरणी केलेली आहे,जर पावसाने अधीक मुक्काम केल्यास त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असुन, या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरबरा पिकाचे क्षेत्र वाढ होण्याचा व दुबार हरबरा पेरणीचा अंदाज पाहुन कृषी उत्पन्न बाजारसमीती मधील व बाहेरील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला हरबऱ्याची विक्री बिजवाई विक्रीच्या दृस्टीने थांबवलेली असल्याचे पहावयास मिळत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close