अन.. डॉक्टरने उजव्या पायाऐवजी कापला रुग्णाचा डावा पाय
नाशिक / नवप्रहार मीडिया नेटवर्क
शासकीय रुग्णालयात रुग्णांसोबत चुकीच्या पद्धतीने वागले जाते, रुग्णांकडे फारसे लक्ष दिले जात नाही.त्यांची काळजी घेतल्या जात नाही अश्या वलग्ना करण्यात येतात. खाजगी दवाखान्यात मात्र रुग्णाची योग्य काळजी घेतल्या जाते म्हणून अनेक लोक परवडत नसतांना देखील नातेवाईकांना खाजगी रुग्णालयात भरती करतात. पण खाजगी रुग्णालयाने एका रुग्णाला भविष्यात कधीही भरून न निघणारे दुःख दिले आहे. त्यांनी रुग्णाच्या उजव्या पायाऐवजी डावा पाय कापला आहे.
याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करताना आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याकडून खूप त्रास दिला गेल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
नाशिकच्या जेलरोडवरील दसक भागात राहणारे सुभाष खेलूकर, वय 59 वर्ष. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ते सिनियर फिटर या पदावर काम करतात. 2014 साली त्यांचा दुचाकीवर एक अपघात झाल्याने त्यांच्या उजव्या पायात रॉड टाकण्यात आला होता. मात्र तो रॉड चालताना दुखत असल्याने तो रॉड काढून टाकण्यासाठी 20 मे 2023 ला नाशिकरोड परिसरातील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले.
हॉस्पिटलमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विपुल काळे यांनी उजव्या पायाचा एक्स रे काढण्यास सांगितले. तसेच ब्लड, युरीन टेस्ट, इ.सी.जी., सोनोग्राफी अशा सर्व टेस्ट करायला सांगितल्या. त्या सर्व टेस्ट करून रिपोर्ट डॉक्टरांकडे सादर करताच डॉक्टरांच्या सांगण्यानुसार 26 मे रोजी खेलूकर ऍडमिट झाले आणि 27 तारखेला दुपारी दीडच्या सुमारास ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेण्यात आले.
बाहेर आल्यानंतर त्यांच्या डाव्या पायावर पाच टाके असल्याचे कुटूंबियांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी मात्र डाव्या गुडघ्यावर ब्लेड पडल्यामुळे दोन टाके पडले असे सांगितले. मात्र काही दिवसांनंतर सुभाष यांना उजव्या बरोबर डाव्या पायानेही चालता येत नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरवर आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.