पाकिस्तान मधील एका प्रसिद्ध विद्यापीठात सुरू होता ड्रग्स आणि सेक्स चा घाणेरडा खेळ
इस्लामीया ( पाकिस्तान ) / नवप्रहार मीडिया नेटवर्क
एकीकडे पाकिस्तान आर्थिक आणि राजकीय संकटाशी झुजत आहे. तर दुसरीकडे या देशातील एका प्रसिद्ध विद्यापीठातुन धक्कादायक बाब समोर येत आहे. इस्लामीया विद्यापीठात सेक्स आणि ड्रग्स चा घाणेरडा खेळ खेळत जात होता ही बाब समोर आली आहे. मुलींना अमली पदार्थाचे सेवन करण्याचे लावून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात आता विद्यार्थिनींचे 5500 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. यादरम्यान अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले, जे पाहून हे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरु असल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान अनेक व्हिडीओही आढळून आले आहेत, ज्यामध्ये प्रथम मुलींना अंमली पदार्थांचे व्यसन लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांचे अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु होतो.
पाकिस्तानी विद्यापीठात घाणेरडा खेळ
दरम्यान, हे प्रकरण पाकिस्तानच्या इस्लामिया विद्यापीठातील आहे. हे विद्यापीठ आता ड्रग्ज आणि लैंगिक शोषणाचे केंद्र बनल्याचे पाक पोलिसांनी उघड केले आहे. पोलिसांच्या तपासात असे अनेक पुरावे मिळाले आहेत, जे याला पुष्टी देतात. आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल फोन आणि इतर पुराव्यांवरुन इस्लामिया विद्यापीठात वर्षानुवर्षे हा घाणेरडा खेळ सुरु असल्याचे उघड झाले आहे. एजाज हुसेन असे या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी या टोळीकडून हजारो अश्लील व्हिडिओचा वापर केला जात होता.
अशा प्रकारे या टोळीचा खुलासा झाला
दुसरीकडे, अबू बकरला अटक केल्यानंतर या टोळीला पकडण्यात पाक पोलिसांना यश आले आहे. अबू बकर हा इस्लामिया युनिव्हर्सिटी बहावलपूरचा वित्त संचालक आहे, जो नुकताच एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला होता. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 30 ग्रॅम चरसही जप्त करण्यात आले. अबू बकरसोबत हजारो घाणेरडे व्हिडिओ सापडले आहेत, ज्यामुळे तो मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. अबू बकरनंतर पोलिसांनी निवृत्त मेजर एजाज हुसैन यांच्यावर छापा टाकला. एजाज हुसेन हे कॉलेजमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून तैनात होते.