हटके

बाईक वरून उतरलेला व्यक्ती अचानक गायब होतो तेव्हा …….? 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                             तो बाईक घेऊन येतो काही लोकांच्या नजरा त्याच्याकडे असतात. तो बाईक उभी करतो आणि कोणाला काही कळायच्या आत अचानक गायब होतो. काय ? काय म्हणालात …? आम्ही खोत बोलतोय ?  अरे मुळीच नाही  ! आम्ही खरं तेच बोलतोय आणि हे घडलय ! हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ! चला तर जाणून घेऊ या काय आहे घटना.

हा  व्हिडीओ पाहून सर्वांना धक्काच बसला आहे. बाईकवरून उतरलेली व्यक्ती अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. जे पाहिल्यावर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.
रस्त्याशेजारी काही गाड्या पार्क आहेत. तिथं एक बाईकस्वार येतो. तोसुद्धा आपली बाईक तिथं पार्क करतो. बाईकवरून तो उतरतो. पण जसा तो बाईकवरून उतरतो, तसा तो जमिनीत सामवतो. हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्यालाही धडकी भरते. – तिथं एक खड्डा आहे. ज्यावर एक पत्रा टाकला आहे. जशी ही व्यक्ती त्या पत्र्यावर पाय ठेवते, तसा पत्रा आत जातो आणि ती व्यक्ती त्या खड्ड्यात पडते. मागोमाग बाईकही त्या खड्ड्यावर आडवी होते.

व्यक्तीसोबत घडलेली दुर्घटना पाहून काही लोक त्याच्या मदतीसाठी धावून येतात. खड्ड्यावर पडलेली बाईक बाजूला करतात. तोपर्यंत खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीचा हात बाहेर दिसतो. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. काही व्हिडीओ असे असतात ज्यावर आपला विश्वासही बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका बाईकस्वाराचा हा व्हिडीओ. ज्यात एक बाईकस्वार बाईकवरून उतरला आणि तो अचानक गायब झाला. सुदैवाने व्हिडीओत या व्यक्तीला काही झालेलं दिसत नाही आहे. @suddenlyhapend ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close