ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार
एकविरा दुर्गात्सव मंडळ घाटंजी चा स्तुत्य उपक्रम
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी शहरात दुर्गाउत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला आहे. यामध्ये संपूर्ण शहरात भाविकांची प्रचंड गर्दी व जल्लोष पाहायला मिळाला अशाही वातावरणात कोणताही अनुचित प्रकार शहरात घडल्याचे ऐकिवात नाही याला कारण म्हणजे संपूर्ण शहराची शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनाकडे होती त्यांनी अत्यंत निष्ठेने ही जबाबदारीपुर्वक पार पाडली. पोलिस प्रशासन व ठाणेदार निलेश सुरडकर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य निष्ठेला सलाम करण्यासाठी घाटंजीतील एकविरा मित्र मंडळाच्या महिला सदस्यांनी नवरात्री उत्सव विसर्जन सोहळ्याच्या वेळी घाटंजी पोलीस स्टेशन चौक येथे ठाणेदार निलेश सुरडकर आणि सहकारी पोलीस कर्मचारी वृंद यांना शाल ,श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमा व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर व त्यांच्या पोलीस सहकारी बंधू भगिनी यांनी या सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे आभार पण मानले.
शहरातील एकविरा मित्रमंडळाच्या वतीने दुर्गात्सव विसर्जनात अत्यंत साधेपणाने टाळमृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली हि बाब इतरांना प्रेरणादायी आहे तसेच सामाजिक बांधिलकी जपत राबविलेले उपक्रम कौतुकास्पद बाब आहे व पोलिस प्रशासनाला दिलेला सन्मान हा आम्हाला पुढील कार्यास प्रोत्साहन देणारा आहे.
निलेश सुरडकर पोलिस निरीक्षक घाटंजी.