सामाजिक

निघोजला कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत महिला शेतकऱ्यांना योजनांची माहिती .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – निघोज येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी पंधरवडा निमित्ताने महिला शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांची माहिती देवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी संजीवनी रासकर यांनी केले आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सुधामती ताई कवाद या होत्या . यावेळी कृषी अधिकारी रासकर यांनी कृषी संजीवनी पंधरवडा व महिला शेतकरी सन्मान दिनानिमित्ताने पंतप्रधान कृषी सन्मान योजना , जमीन सुपिकता जागृती , महात्मा गांधी रोजगार हमी योजना फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार , पिक व फळ बाग विमा योजना , सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान , तुर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान , पंतप्रधान कृषी संजीवन योजनेची माहिती व शेतकरी गट या सर्व विषयांची सविस्तर व मार्गदर्शन केले आले व उपस्थित महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली .
तर सुधामती ताई कवाद यांनी या कार्यक्रमा निमित्ताने महिला शेतकऱ्यांविषयी संवेदना प्रकट करून समाधान व्यक्त केले .
याप्रसंगी महिला शेतकरी सौ भिमाबाई कवाद , छाया कवाद , वर्षा कवाद , कल्पना कवाद , कौसाबाई कवाद , नंदा कवाद , नंदा साळवे , हिराबाई लासुर्वे व इतर मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिता निघोजकर यांनी केले .
उपस्थित महिलांनी या महिला कृषी चर्चा सत्रा बद्दल समाधान व्यक्त केले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close