विशेष

प्रेयसिने 50 रु.च्या नोट वर असे काय लिहिले की ही नोट सोशल मीडियावर होतेय व्हायरल 

Spread the love

                   पूर्वी प्रेम प्रगट करण्यासाठी पत्राचा वापर केला जात होता. पण आता मोबाईल च्या युगात पत्राची जागा मॅसेज ने घेतली आहे. सध्या सोशल मीडियावर एका 50 रु च्या चलनी वर लिहिलेला एक मॅसेज तुफान व्हायरल होतोय . चला तर पाहू या नेमके काय लिहिले आहे त्या नोटेवर.

   गर्लफ्रेंडनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी 50  रुपयांच्या नोटेवर एक गोष्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुर्वीच्या काळी कबुतराच्या माध्यमातून प्रेम संदेश पाठवला जायचा. मात्र आता संपर्क करण्याची साधने बदलली आहेत. सोशल मीडियाच्य काळातही आजही अनेकजण नोटेवर संदेश पाठवताना दिसत आहेत. अशाच या नोटेवरचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनिकेतच्या नावानं ५० रुपयांची नोट व्हायरल होत आहे. ही नोट ज्योती नावाच्या मुलीनं लिहिलेय. ती म्हणतेय, तिला पैसा नकोय फक्त अनिकेतचं प्रेम हवंय. संपूर्ण मेजेस वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल तसेच अनेकांना त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण होईल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या नोटेवर नेमकं लिहलंय तरी काय? तर या नोटेवर “अनिकेत मला तुझे पैसे नको फक्त प्रेम हवं आहे. बसमागे नको, कॉलेजच्या मागे भेट कारण माझा मामा कंडक्टर आहे. तुझीच वेडी ज्योती. आय लव्ह यू अनिकेत.” अशा आशयाचा मेसेज एका ५० रुपयांच्या नोटेवर लिहिला आहे. या नोटेमार्फत ज्योतीनं आपल्या प्रियकराला सिक्रेट मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. पण हा मेसेज बहुदा फेल गेला असल्याची शक्यता आहे. कारण ही नोट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

आता दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र करणाऱ्यांची कमी नाही. किती तरी लोक असे आहेत, जे अशा कपलला भेटवण्यासाठी जमीन-आकाशही एक करतात. ही नोट किंवा ही पोस्ट पाहिल्यानंतरही असंच काहीसं घडतं आहे.या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी याला गांभीर्याने घेतलं आणि आपण अनिकेत-ज्योती यांना भेटवणारच असा निश्चय केला आहे. ज्योतीचा हा मेसेज त्या अनिकेतपर्यंत पोहोचवण्यासाठी काहींनी धडपड सुरू केली आहे. काही जण त्या विशालला शोधू लागले आहेत. तर काही लोकांनी हे मजेत घेत त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close