भरधाव कार डिव्हायडर ला भिडली, कार ला लागलेल्या आगीत डॉक्टर आणि कार जळून खाक

हैदराबाद / विशेष प्रतिनिधी
हैदराबाद येथून एक थरारक घटना समोर आली आहे. कार डिव्हायडर ला धडकली आणि कार ने पेट घेतल्याने त्यात बसलेले प्रसिद्ध न्यूरो सर्जन कसकुर्थि जगदीश यांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे.
हा अपघात रविवारी सव्वा सातच्या सुमारास खम्मम-हैदराबाद महामार्गावरील सूर्यापेटमधील पिल्लमारीजवळ घडला.
गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती डिव्हायडरला धडकली
प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टरांच्या भरधाव वेगातील व्होल्वो कारवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ती रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, गाडीला तत्काळ आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच सर्व काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. जाणाऱ्या लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणेपर्यंत, संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती आणि आत असलेल्या डॉक्टरचा गुदमरून आणि भाजल्यामुळे मृत्यू झाला होता.
कसक्कुर्ती आपल्या कुटुंबाला भेटायला परत येत होते
गाडीच्या नोंदणी क्रमांकावरून मृताची ओळख डॉ. कसक्कुर्ती जगदीश अशी पटली आहे. ते खम्मम येथील ममता रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत होते आणि रविवारी आपले काम संपवून खम्ममहून हैदराबादला आपल्या कुटुंबाला भेटायला येत होते. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार गाडी चालवताना डॉक्टरला डुलकी लागली असावी, ज्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. तथापि, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, न्यायवैद्यक पथकाने जळालेले अवशेष ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.



