मतदान करणाऱ्यांना केलं रॅली काढून जागृत.
चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी *प्रकाश रंगारी*
चांदुर रेल्वे नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी शहरामध्ये रॅली काढून मतदान करणाऱ्यांना जागृत करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आव्हान केले आहे.
चांदुर रेल्वे नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांच्या मार्गदर्शनामध्ये अमरावती बीडीएस ग्रुप आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये टक्केवारी मध्ये वाढ होऊन जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे. यासाठी आज उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे आणि तहसीलदार पूजा माटोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदुर रेल्वे नगरपालिका मधून मतदाता जागृत रॅली काढण्यात आली. हे मतदान जागृत रॅली शहराच्या मुख्य मार्गाने फिरून येऊन चौकात अमरावती बीडीएस ग्रुपच्या माध्यमातून पथनाट्य सादर करून मतदानाचे महत्त्व पटवून दिले. लोकतंत्र मध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. प्रत्येक व्यक्ती मतदान करून, आपला योग्य जनप्रतिनिधी निवडू शकतात. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मताची किंमत समजून मतदान केलं पाहिजे. असे आव्हान उपस्थित नागरिकांना नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी केले. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी अभियंता संगीता जावडे, शारदा कावळे, संदीप माहुरे, योगेश वासनिक,
राहुल इमले, जितू कर्से, बंडू , देविका वनवे, गनौकर आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.