क्राइम

बापरे……चाय विकणारा चालवत होता बोगस कॉलेज

Spread the love

विद्यार्थ्यांचा पैसे मागणीसाठी ससेमिरा लागू नये म्हणून रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

एटा / विशेष प्रतिनिधी

                   पोलिसांनी एका बोगस शिक्षण संस्थेचा पर्दाफाश केला आहे.मुख्य म्हणजे हे बनावट कॉलेज एक चाय विकणारा चालवत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे मागण्यासाठी विद्यार्थी पैसे परतीची मागणी करतील म्हणून त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता.

या आरोपींनी दोन कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. या बोगस डिग्री सर्टिफिकेटच्या घोटाळ्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशच्या मारहरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी रामसेवक नावाच्या व्यक्तीने 112 क्रमांकावर कॉल करून माहिती दिली. त्याने भाऊ सतेंद्र कुमार याने काही लोकांचं अपहरण केल्याचं सांगितले. त्यांची सुटका करण्यासाठी त्याने 20 लाखांची मागणी केली होती. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच सतेंद्रचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या आगरा येथून ताब्यात घेतलं. पोलिसांनी तपास केल्यानंतर अपहरणाचं प्रकरण देखील बोगस निघालं.

पोलिसांच्या माहितीनुसार, सतेंद्रने स्वत:हून अपहरणाचा बनाव रचला होता. विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांनी दिलेले पैसे परत मागू नये, यासाठी त्याने बनाव रचला होता. पोलिसांना तपासात माहीत झालं की, 2022 साली ‘बीएस मेडिकल कॉलेज अँड यूनिवर्सिटी’ च्या नावाने विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी फसवणूक करून प्रवेश दिला होता. या अभ्यासक्रमांमध्ये डी-फार्मा, बी-फार्मा, बी.एस्सी. नर्सिंग, डीएमएलटी, बीएमएलटी, जीएनएम आणि एएनएम याचा समावेश होता. विद्यार्थ्यांना डिग्री आणि मार्कशीट देण्याचं देऊन मोठी रक्कम स्वीकारली होती. त्याचे अनेक विद्यार्थ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी या प्रकरणात सतेंद्र कुमार, गौरव अग्रवाल, भगवान दास, नरेंद्र उर्फ पप्पू आणि मोहम्मद शरीफ कुरैशीला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, भगवान दास याचा चहा विक्रीचा व्यवसाय होता. भगवान हाच बोगस मेडिकल कॉलेज-विद्यापीठ चालवत होता. आरोपींकडून लॅपटॉप, बोगस चेक, विद्यार्थ्यांचे आयडी कार्ड, फी पावती, हजेरी प्रत, मार्कशीट असे अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना कोर्टात हजर केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात इतर व्यक्तीची काही भूमिका होती का, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close