हटके

बागेश्वर धाम ची भविष्यवाणी निघाली खोटी , वडिलांची अनिस कडे धाव 

Spread the love

बागपूर: बागेश्वर धाम येथे गेलेल्या दाम्पत्याला पुत्रयोग असे चिठ्ठीत लिहून देण्यात आले होते. पण त्यांना चौथी मुलगी झाल्याने संतापलेल्या वडिलांनी अनिस कडे धाव घेतली. त्याने बागेश्वर धाम येथे जाऊन सुद्धा आपला संताप व्यक्त केल्याचे सांगितले. चला जाणून घेऊ नेमकं प्रकरण काय आहे ?

बागेश्वर धाममध्ये काय सांगण्यात आल्याचा दावा आहे?

संबंधित व्यक्तीने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिलेल्या माहितीनुसार, बागेश्वर धाम येथे त्याला पत्नीच्या कथित ‘प्रेतबाधे’बाबत सांगण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या पर्च्यावर ‘पुत्र योग’ असल्याचे लिहिले होते, असा त्याचा दावा आहे. त्यामुळे पुढील अपत्य मुलगा असेल, अशी अपेक्षा त्याच्या मनात निर्माण झाली. चिठ्ठी आणि त्यावर काय लिहिले आहे, याची पालक आणि अनिसशिवाय त्रयस्थ संस्था वा व्यक्तीकडून खात्री झालेली नाही.

मुलीच्या जन्मानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

चौथ्या अपत्याच्या रूपानेही मुलगी जन्माला आल्यानंतर कथित ‘पुत्र योग’च्या दाव्याबाबत प्रश्न पडल्याचे या व्यक्तीने समितीला सांगितले. संतापाच्या भरात बागेश्वर धामच्या दरबारात जाऊन आपण आक्षेप व्यक्त केला होता, असेही त्याचे म्हणणे आहे. मुलगी जन्माला आल्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा तिच्याशी काहीही संबंध नाही, याची जाणीव नंतर झाल्याचे त्याने सांगितले.

वडिलांनी अनुभव सार्वजनिक करण्याचे कारण काय सांगितले?

दैवी शक्ती किंवा भविष्यवाणीच्या दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी नागरिकांनी विवेकबुद्धीने विचार करावा, असे आवाहन संबंधित व्यक्तीने समितीमार्फत केले आहे. आपल्याला आलेला अनुभव इतरांच्या बाबतीत येऊ नये, म्हणून तो सार्वजनिक करत असल्याचे त्याने सांगितले. समितीने पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या मुलीला शुभेच्छा दिल्या. प्रत्येक बालकाला समान प्रेम, शिक्षण आणि सन्मान मिळाला पाहिजे, असा संदेशही समितीने दिला. याबाबत पालकाने अनिस पदाधिकाऱ्यांशी बोललेले संभाशनची क्लिप व्हायरल झाली आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्कानंतर काय बदलले?

संबंधित व्यक्तीने समितीशी संपर्क साधल्यानंतर त्याच्याशी चर्चा करण्यात आली, असे समितीने कळवले. मुलगा होईल या अपेक्षेपोटी मुलीवर नाराज होणे चुकीचे असल्याचे वडिलांनी मान्य केले. ‘आमची मुलगी आम्हाला प्रिय आहे. तिला चांगले शिक्षण, योग्य संस्कार आणि आनंदी जीवन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,’ अशी भूमिका त्यांनी समितीसमोर मांडल्याचे निवेदनात नमूद आहे. सध्या ही मुलगी सुमारे चार महिन्यांची आहे.

समितीने कोणती मागणी केली आहे?

संबंधित पर्चा, त्यावरील कथित ‘पुत्र योग’चा उल्लेख आणि व्यक्तीने सांगितलेला घटनाक्रम यांची स्वतंत्र व वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. श्रद्धेच्या नावाने भविष्याबाबत ठाम आश्वासन दिले गेले असेल, तर त्या दाव्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे, असे समितीचे म्हणणे आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close