महिलांना गृहउद्योगातून सक्षम करण्यासाठी ४४% सवलतीत पीठ गिरणी वाटप शुभारंभ
आमदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या विशेष
प्रयत्नानेअंजनगाव सुर्जी , मनोहर मुरकुटे
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघांमधील महिलांकरिता आमदार बळवंत वानखडे नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात, जेणेकरून ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब शेतमजूर महिला भगिनींच्या हाताला काम मिळून रोजगार
मिळेल व त्या सक्षम होतील. आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतील असा आमदार महोदयांचा नेहमीच प्रयत्न असतो.
याच संकल्पनेतून आमदार बळवंत वानखडे ( दर्यापूर- अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्र ) यांच्या विशेष प्रयत्नातुन दर्यापूर अंजनगांव विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी खास घरगुती पिठाची गिरणी ४४% सवलतीत वाटप ही योजना दर्यापूर व अंजनगाव सुर्जी मतदारसंघांमध्ये मागील महिन्यापासून राबविण्यात आली होती अंजनगाव सुर्जी शहर व ग्रामीण भागातून या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आज अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नोंदणी केलेल्या महिलांना व त्यांच्या समूहांना पीठ गिरणीचे वाटप आमदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. या उपक्रमातून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील महिलांना गृह उद्योगास करण्यास चालना मिळेल. ही पीठ गिरणी सर्व प्रकारचे धान्य, हळद,
मिर्ची, मसाला, खारीक, खोबरे, भर्डा इत्यादी दळण्यास सक्षम आहे.
यावेळी प्रमोद पाटील दाळु , अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी , अंजनगाव सुर्जी , गणेशभाऊ देशमुख , रमेशभाऊ सावळे , कैलासभाऊ शिरसाठ , अमोलभाऊ आठवले , राजेंद्र अढाऊ ,आदी मान्यवर व महिला उपस्थित होती