क्राइम

भोंदू  बाबा मिश्रा कडून  अत्याचाराला ‘ प्रसाद ‘ असे नामकरण 

Spread the love

विशेष प्रतिनिधी / पुणे 

                  खराडी येथील भोंदू बाबा राधामोहन मिश्रा याच्या कडून एका महिलेवर १७ वर्षांपासून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फुटली आहे. त्याचे काळे कारनामे आणि त्यात त्याला मदत करणाऱ्या सहा महिला अनुयायांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य म्हणजे या भोंदू बाबाच्या पीडित महिलेचे पालक असे अडकले होते की तिने पालकांना वारंवार तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची कल्पना देण्याचा प्रयत्न केला.पण ते काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी तिने सगळे पुरावे गोळा करत पोलिसा कडे धाव घेतली.

अत्याचाराला ‘प्रसाद’ असे संबोधून तिचा अमानुष छळ केल्याचा आरोप पीडितेने दिलेल्या पुरवणी जबाबात केला आहे.
खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

महिला अनुयायीच शिक्षा ठरवत

सन २०१३ मध्ये उबाळेनगर येथील आश्रमात वास्तव्यास असताना महिला अनुयायीच पीडितेला शिक्षा देण्याचे प्रकार ठरवत असत. काम वेळेत पूर्ण न केल्यास ‘टेझर गन’चे शॉक, मेणबत्तीचे चटके आणि मारहाण केली जात होती. काही वेळा तिला विवस्त्र करून मिश्राच्या खोलीत ढकलले जात असे आणि विरोध केल्यास ‘आम्हीही हे सहन केले आहे, हाच कल्याणाचा मार्ग आहे,’ असे सांगून गप्प केले जात होते.घाणेरडे व्हिडिओ दाखवून अत्याचार

काही महिला अनुयायी मिश्राला आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवत असत आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असत. अनेक प्रसंगी तिचे हात-पाय बांधण्यात आले, गुंगी आणणारी इंजेक्शने देण्यात आली; तसेच जबरदस्तीने मूत्र पाजल्याचाही दावा करण्यात आला आहे.

महिला आरोपींना एफआयआरपूर्वीच अटक?

या प्रकरणात अटक झालेल्या सहा महिला आरोपींनी ॲड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबिअस कॉर्पस’ याचिका दाखल केली आहे. या सहा महिला विविध न्यायालयांमध्ये वकिली करतात. या प्रकरणात पहाटे ‘एफआयआर’ची नोंद झाली; परंतु त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आल्याचा दावा या याचिकेत केला आहे. त्याला मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध दर्शविला.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या युक्तिवादात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले असून, आरोपींना जामीनासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज करण्याची मुभा दिली आहे; तसेच राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close