पाच लोकांचा मृत्यू
चेन्नई / नवप्रहार डेस्क
अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुमंगलमजवळील शिवराकोट्टई येथे आज सकाळी विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर भीषण अपघात झाला. यात कारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.
व्हिडिओमध्ये दिसतं, की एक कार भरधाव वेगात महामार्गावरून चालली आहे. अचानक ही कार पुढे चाललेल्या दुचाकीला जोराची धडक देते. या धडकनेनंतर कार अनियंत्रित होत दुसऱ्या लेनमध्ये शिरते. कार हवेत उडेत आणि तिसऱ्या लेनमध्येही प्रवेश करते. यावेळी ती इतरही काही गाड्यांना धडक देते. अवघ्या काही सेकंदात ही भीषण दुर्घटना घडली
या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता, की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. इतर दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवराकोट्टई येथे चालकाचं नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून घसरलेल्या कारने आधी दुभाजकाला धडक दिली आणि नंतर कार दुचाकीवर जाऊन आदळली