अपघात

बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ११ लोकांचा मृत्यू 

Spread the love
 
वैशाली ( बिहार) / विशेष प्रतिनिधी 
                   बोटीवरील नियंत्रण सुटल्याने बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांपैकी ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून एकूण २० लोक प्रवास करीत होते. ते एका मेजवानीसाठी जात होते. घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात, राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर श्यामचंद गावाजवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका मेजवानीच्या कार्यक्रमासाठी काही तरूण बोटीतून प्रवास करत होती. बोट नदीच्या मध्यभागी पोहोचली असता खलाशाचं बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि बोट उलटली. अचानक बोट उलटल्यानं लोकांना जीव वाचण्याची संधी मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले.

माहिती मिळताच राघोपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी एसडीआरएफ (SDRF) पथक रवाना केले. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरलीय. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून नदीत बुडालेल्यांचा शोध घेतला जातोय.

अपघात कसा घडला?

चौकशीनंतरच बोट उलटण्यामागची कारणे स्पष्ट होतील. तसेच, बोटीवर नेमके किती लोक होते आणि अपघातानंतर किती जणांची सुटका करण्यात आली. बोटीची क्षमता, प्रवाशांची संख्या आणि सुरक्षिततेची व्यवस्था यांसारख्या बाबींचीही चौकशी केली जाईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close