अपघात

सकाळी ११.४६ वा. मित्रासोबत तरुणीची हॉटेल मध्ये एन्ट्री आणि संध्याकाळी ६ वाजता १० व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Spread the love

लखनऊ / विशेष प्रतिनिधी

                  सकाळी ११.४६ वाजता येथील फोर स्टार हॉटेल सेलेस्टियल येथे एका  २४ वर्षीय तरुणीने आपल्या मित्रासोबत प्रवेश केला.आणि संध्याकाळी तिचा १० व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि फील्ड युनिटनं हॉटेल परिसरात धाव घेतली. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेलेस्टियल नावाचं फोर स्टार हॉटेल आहे. या हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय तरुणीनं जीव गमावला. ही घटना सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. डीसीपी मोहम्मद मुश्ताक यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटनेबद्दल हॉटेल सेलेश्टियलच्या सुरक्षा प्रभारी अधिकाऱ्यानं संध्याकाळी साडे सहा वाजता पोलिसांना कळवलं.
 
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये राहणारी समरिन नावाची तरुणी सुलतानपूरचा रहिवासी असलेल्या अवनीश सोबत दुपारी ११ वाजून ४६ मिनिटांनी हॉटेलमधील १०३७ क्रमांकाच्या खोलीत पोहोचली होती. यानंतर संध्याकाळी ६ च्या सुमारास तिचा संशयास्पद स्थितीत शेवट झाला. दहाव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला.
 
समरिन एका हॉटेलात काम करायची. सोमवारी सकाळी ती कामावर जाण्यासाठी घरातून निघाली. संध्याकाळी तिच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना समजली. ती हॉटेलात कशी पोहोचली, कशासाठी पोहोचली, याबद्दल कुटुंब अंधारात आलं. कामावर जाण्यासाठी निघालेल्या समरिनचा शेवट हॉटेलात झाल्यानं कुटुंब बुचकळ्यात पडलं आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close