तात्यासाहेब देशमुख यांचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरव…!!
अकोले : रविवार दि. ०४-०८-२०२४ रोजी जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्था वैजापूर,छत्रपती संभाजीनगर येथे “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार” या पुरस्काराचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता अकोले तालुक्याचे भूमिपुत्र मातोश्री शांताई देशमुख सोशिअल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब देशमुख यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली दहा वर्षांपासून या पुरस्काराचे आयोजन सूर्यकांत पाटील मोटे यांच्या माध्यमातून करण्यात येते.कला,शैक्षणिक, सामाजिक,राजकीय,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते,देशमुख यांना सामाजिक कार्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले देशमुख हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकरसाहेब,पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष तसेच अशोक सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक एस. झेड.देशमुखसर,लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोतेसाहेब,वडील अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन तसेच अगस्ती कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोकराव देशमुख,चुलते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभियंता तसेच नूतन शिक्षण संस्था कल्याण उपाध्यक्ष नंदकुमार देशमुख,बंधू उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे कार्यक्षम माजी सरपंच विद्यमान उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टिस्टेटचे संचालक महीपाल देशमुख या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी अकोले तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांचे अतोनात हाल झाले होते,घरात पाणी शिरल्यामुळे घरातील गृहउपयोगी वस्तू वाहून गेल्या होत्या तेंव्हा देशमुख यांनी “एक हात मदतीचा” ही संकल्पना राबवत आपला मित्रपरिवार,मुबंई अंधेरी येथील जैन संघ फाउंडेशन यांच्या माध्यमातून बकेट,चटई,बॅटरी, ब्लँकेट अशा प्रकारच्या १० गृहउपयोगी वस्तूंचा संच 500 ऊसतोडणी कामगारांना दिला होता.तसेच ते दरवर्षी त्यांच्या आज्जी-आजोबांच्या पुण्यस्मरणानिमित्त “एक मायेची ऊब” म्हणून ऊसतोडणी कामगारांना ब्लँकेटच वाटप करत असतात,कोल्हापूर पूरग्रस्तांना आपल्या फाउंडेशन च्या मध्येमातून “फुल नाही तर फुलाची पाकळी” या संकल्पनेतून धान्य व काही ब्लॅंकेट साठी मदत केली होती.सामाजिक कार्यासोबतच शैक्षणिक कार्यात देखील त्यांची मदत होत असते त्यांनी त्यांच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेसाठी मुंबई येथील सोशिअल फाउंडेशनच्या मध्येमातून एलसीडी टीव्ही व क्रीडा उपयोगी वस्तू भेट दिल्या होत्या,याच बरोबर धार्मिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान राहिले आहे गावातील राममंदिर नवनिर्माणासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने ३७ हजार रुपये देवस्थान ट्रस्टकडे दिले होते तसेच त्यांची अनेक गरजू मुलांना वेळोवेळी मदत होत असते.देशमुख यांना सन्मानित केल्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रपरिवार,नातेवाईक यांनी सोशल मीडिया,फोन,प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.हा पुरस्कार अखंड भारताचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असल्यामुळे आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तसेच यापुढे सामाजिक कार्यातील जबाबदारी देखील वाढलेली आहे असे देशमुख यांनी मत व्यक्त केले.