हुल्लडबाजी अंगलट ; तरुणाची झाली अशी अवस्था
सुटीच्या दिवशी मित्रमंडळी एकत्र आली की मग बनतो कुठेतरी जायचा प्लॅन . तलाव नदी किंवा स्विमिंग पूल असलेल्या रिसॉर्ट ला तरुणाईची पहिली पसंती असते. कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीचे बंधन नसल्याने तरुणाई इच्छेप्रमाणे वागतात. पण तरुणाईची ही हुल्लडबाजी कधी कधी अंगलट येते. असाच प्रकार मित्रांसोबत सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तरुणा सोबत घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिसॉर्टमध्ये मज्जा मस्ती करण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक व्हिडीओ पाहाच
व्हिडीओत एका स्विमिंग पूलमध्ये काही तरुण पोहण्याचा आनंद घेतायत. यावेळी काही तरुण मिळून एका तरुणाचे दोन्ही हात-पाय पकडून पूलमध्ये फेकत असतात. पण, फेकताना तीन तरुण त्या तरुणाचे हात-पाय सोडून देतात; पण एक जण त्याचा हात तसाच पकडून ठेवतो त्यामुळे तरुण पुलामध्ये न पडता, पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळतो. त्यानंतर त्याच्याबरोबर असे काही घडते की, पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
व्हिडीओत पाहू शकता की, मित्रांचा एक ग्रुप आनंदाने स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतायत. यावेळी काही तरुण पूलाच्या कठड्यावर उभे राहून, एका तरुणाला उचलून मस्करी मस्करीमध्ये पूलमध्ये फेकत असतात. त्यासाठी तरुणाचे हात-पाय पकडतात; पण पूलमध्ये फेकण्यासाठी तीन तरुण त्याला झुल्यासारखे झुलवतात आणि हात-पाय सोडून देतात. पण, तरुण त्याचा हात तसाच पकडून राहतो. त्यामुळे तो पूलमध्ये न पडता, पूलाच्या कठड्यावर आदळतो. त्याच्याबरोबर हात पकडणारा तरुणही कोसळतो; पण यात त्या तरुणाच्या गुप्तांगाला मार लागतो. ज्यामुळे तो पूलमध्ये उभा राहून वेदनेने कळवळतो. अखेर सर्व जण त्याला पूलच्या बाहेर काढतात. पण, तुमच्या मजा-मस्तीमध्ये कशा प्रकारे एखाद्याला दुखापत होऊ शकते हे या व्हिडीओतून दिसतेय.
त्यामुळे रिसॉर्टमध्ये मित्रांबरोबर मजा-मस्ती करताना काळजी घेतली पाहिजे. तुमच्या वागण्याने किंवा कृतीने कोणाला दुखापत तर होणार नाही ना याचा जरा विचार केला पाहिजे. कारण- या व्हिडीओतही मित्रांची मजा-मस्करीच त्या तरुणासाठी भारी पडली आहे.
हा धक्कादायक व्हिडीओ @mediarenang.id नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी म्हटलेय की, अशा प्रकारची मजा-मस्करी प्लीज कोणी करू नका. कारण- त्यात अनेकदा दुखापत होते. काहींनी म्हटलेय की, हे मित्र नाहीत; शत्रू आहेत. अशा लोकांपासून दूर राहणेच चांगले आहे. तर अनेकांनी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडूनही लोक त्यातून धडा का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे.