डीआयजी एस पी एडिशनल एसपी आर्वीत रात्री साडेआठ पर्यंत कार्यवाही सुरू…
प्रॉपर्टीचा वाद..
आर्वी / प्रतिनिधी
बँक ऑफ इंडियाच्या लिलावात वसंत नगर येथील अजय कदम यांचे निवासस्थान राकेश लक्ष्मीचंद खत्री, दीपक मोटवानी करन मोटवानी या तिघांनी एक करोड 56 लाख 60हजारात घेतले त्याचा बँकेने ताबा दिला लिलाव 26 /12 /2024ला ऑनलाइन झाला
तारीख 23 /1/2025ला खरेदी करून ताबा दिला त्यावर तारीख 26 ला कॅमेरे लावण्यास गेले असताना तिथे वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर मारहानित झाले राजकारण आडवे आले शेवटी एसपी, ॲडिशनल एसपी डीआयजी यांना आर्वी येथे यावे लागले रात्री बातमी लीही पर्यंत हा वाद सुरूच होता …
———–
याबाबत मी व माझ्या दोन पार्टनर यांनी बँक ऑफ इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली.ऑनलाईन पैसे भरले बँकेने आम्हाला ताबा,व चाबी दिली मी सीसीटीव्ही लावण्यास गेलो असताना तेथे विनाकारण वाद करून मारहाण करण्यात आली माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला याची सखोल चौकशी व्हावी मी काउंटर रिपोर्ट देण्यासाठी गेलो असताना माझी रिपोर्ट घेण्यात आले नाही..
असे
एडवोकेट दीपक मोटवानी यांनी सांगितले
तर एडवोकेट दीपक मोटवानी याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात आला आहे तक्रारीत म्हटल्याप्रमाणे
आर्वी. अधिकार नसताना घरात जबरदस्तीने घुसून घराचा ताबा घेण्याच्या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आर्वीतील एका वकिला विरोधा मध्ये आर्वी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर प्रकरण असे की
लेखी रिपोर्ट नुसार अजय यशवंतराव कदम यय 57 वर्षे, करण अजय कदम वय 25 वर्ष, कुणाल अजय कदम वय 22 वर्षे, बाजी राम निस्ताने वय 22 वर्ष, राम त्यंबकराव निस्ताने वय 56 वर्षे, सो. सुनिला अजय कदम सौ. नमिता करण कदम वय 25 वर्षे, यांनी अॅड. दिपक मोटवानी, करण मोटवानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली
लेखी तक्रारीनुसार दि.25/01/2025 रोजी रात्री 09.00 याजता तक्रारकर्ता क्र. 1 त्याचे मुले करण, कुणाल, पत्नी सुनिता आणि सुन नमिता यांचे सोबत घरी हजर असतांना त्याचे प्रमाणे तक्रारकर्ता 445 हे सुध्दा माझ्या घरी हजर असतांना गैरअर्जदार / आरोपी हे आमचे घरात शिरले व जबरीने माझे गोडावून, ऑफीस व मस्स्य पालन असलेल्या खोलीत बेकायदेशीरपणे कुठलाही अधिकार नसतांना कुलूप लावण्याचा बेकायदेशीर प्रयत्न त्यांनी केला.
आम्ही तक्रारकर्ता यांनी गैरअर्जदारांना बेकायदेशीर कृत्य करण्यास चांगलेपणे मनाई केली असता, दोघेही गैरअर्जदार हे माझे कुटूंबावर धावून आले व तसे असतांना त्यांनी माझे पत्नीला व सुनेला धक्काबुक्की सुध्दा केली व विनयभंग केला.
आमचा प्लॉट क्र. 4 या मिळकतीचा न्यायालयात वाद शुरु असून आमचे सद्याचे राहते घर ऑफीस आणि गोडावून यांचा कुठलाही वाद न्यायालयात सुरु नाही. प्लॉट क्र. 4 ही मिळकत वसंतनगर मध्ये असुन बैंक ऑफ इंडीया ने सदर मिळकत रॉकेश लक्ष्मीचंद खत्री, रा. नागपूर या ईसमास विक्रीचा करार केला आहे. परंतू आमचे सद्याचे राहते घर गोडावून, ऑफीस व मस्त्य पालन खोली ही आजही आमचे ताब्यात असुन त्याबाबत कुठलाही बाद बैंक ऑफ इंडिया तसेचे रॉकेश लक्ष्मीचंद खत्री यांचे सोबत नाही.
आरोपीनी काल रात्री त्याचे सोबत 4-5 मुसलमान समाजाचे लोक सुध्दा आमचे घरी घेवून आले होते व त्या लोकांनी सुध्दा अश्लिल भाषेत शिवीगाळ करून माझी पत्नी व सुनेला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली व घर खाली न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
वास्तविकता गैरअर्जदार आरोपी यांचा आमच्या कुठल्याही काहीही संबंध नाही असे असतांना सुध्दा त्यांनी व त्याचे सोबत असलेल्या जोडजमावाने आमचे सोबत मारझोड केली, त्यामध्ये माझे दोन मुलाना व सुनेला व पत्नीला माझा मित्र नामे राम निस्ताने व त्याचा मुलगा नामे बाजी निस्ताने याला सुध्दा धक्काबुक्की केली या मुळे माझ्या मुलाला मुका व दिसणारा मार लागलेला आहे, त्यांना कृपया दवाखान्यात वर्ग करण्यात यावे
6) सदर बाबीची तक्रार मी काल सुध्दा दिलेली होती, परंतु कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
त्या प्रकारे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता सुध्दा गैरअर्जदार यांनी त्यांचे सोबत 10 ते 15 लोक मुसलमान समाज काही शिख समाजाचे लोक घेवून आमचे राहते घरी ऑफीसमध्ये, गोडावून मध्ये मस्त्य पालन असणाऱ्या खोली जवळ येवून मला माझ्या मुलांना तसेच तक्रारकर्ता क्र. 4 व 5 यांना मारहाण केली व आम्हाला घरातून हाकलण्याचा तसेच बेकादेशीरपणे आम्हाला घरातून बेदखल करण्याचा आणि आमच्या मिळकतीला नुकसान पोहचविण्याचा बेकायेदशीर प्रयत्न केला या घटनेत सुध्दा माझ्या मुलगा, मला तसेच तक्रारकर्त क्र. 4 व 5 यांना बऱ्याच मारहाणीमुळे जखमा झालेल्या आहे, या घरामध्ये वास्तविकता गैरअर्जदाराचा कुठलाही संपर्क येत नाही परंतू गैरअर्जदार क्र. १ हा वकीली सोडून दलालीचे मार्गाने आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करुन आम्हाला घरातून बेदखल करण्याचा आमचा मिळकतीचा बेकायदेशीर ताबा मिळण्याचा प्रयत्न करीत आहे. दि. 26/01/2025 रोजी घटनेत आमच्या घरात असलेले मौल्यवान वस्तु माझा घरात असलेली 10 हजार रुपयाची रोख रक्कम तसेच माझा मुलगा करण यांचे बोटात असलेली सोन्याची आंगठी ही सुध्दा गैरअर्जदार यांनी हिसकावून घेतलेली आहे.
करीता सदर तक्रारीचे संज्ञान घेवून गैरअर्जदार / आरोपी तसेच अज्ञात व्यक्तीविरुध्द नोंद घेवून कार्यवाही करण्यात यावी. तसेच सदर घटनेचा पंचनामा करण्यात यावा व तक्रारकर्ता यांना मेडीकलसाठी दवाखान्यात नेण्यात यावे.
वरिल तक्रारदार यांचे लेखी तक्रारीवरुन सदरचा गुन्हा मा ठाणेदार सा यांचे आदेशान्वय नोंद करुन तपासात घेतला विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दिलीप पाटील भुजबळ साहेब तसेच वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील तपास करण्याचे आदेश दिले