निवडणूक आयोगाच्या पक्षपातीधोरणाविरोधात काँग्रेस आक्रमक
संविधान चौकात केले आंदोलन, जिल्हाधिकाºयांना निवेदन
यवतमाळ प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरोधात जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज राष्ट्रीय मतदार दिनी संविधान चौकात विरोधी पक्ष नेते विजय वेडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणूका घ्याव्या, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना निवेदनातून केली आहे.
लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु मागील काही वर्षात निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती झाली आहे. असा आरोप काँग्रेसने केला आहे. सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते,अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात ५० लाख मतांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे २०१९ ते २०२४ या पाच वर्षात केवळ ५ लाख मतदार वाढले आहे. शिवाय विधानसभा मतदानादिवशी संध्याकाळी ५ वाजता जाहिर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसºया दिवशी सकाळी जाहीर केलेल्या टक्केवारीत मोठी तफावत आहे. यात ७६ लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे आज २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून जिल्हा काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्ष नेते विजय वेडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात आंदोलन केले. यावेळी आ. बाळासाहेब मांगुळकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, मनीष पाटील, जावेद अन्सारी, जितेंद्र मोघे, रवी ढोक, बबलू देशमुख अनिल गायकवाड, ओम तिवारी, स्वाती येंडे, वैशाली सवई, उषा दिवटे, प्रबोधनी रामटेके, आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.