लोकशाहीचे पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर : विजय वेडेट्टीवर

निवडणूक आयोगाच्या भुमिकेवर पत्रपरिषदेत घाणाघात
यवतमाळ प्रतिनिधी : निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग भाजपच्या इशारांवरती चालत आहे. यामुळे स्वायत्त संस्थांचा बट्याबोळ झाला आहे. लोकशाहीचे पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.असा घाणाघात विरोधी पक्ष नेते विजय वेडेट्टीवार यांनी केला आहे.
यवतमाळ येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना वेडेट्टीवार म्हणाले, निवडणूक आयोगाचे अनेक निर्णय विवादास्पद आहे. लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाची आहे. परंतु अलीकडच्या काळात निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक होतांना दिसत नाही. संविधानावर हा देश चालतांना दिसत नाही. २०१९ ते २०२४ या पाच वर्षाचे पाच लाख मतदार वाढले. लोकसभा ते विधानसभा या निवडणुकीच्या सहा महिन्यात ५० लाख मतदार कसे वाढले. विधानसभेवेळी पाच वाजल्यानंतर ७६ लाख मतदान कसे झाले याचे कुठलेही इतर निवडणूक आयोग कडे नाही. भाजपच्या कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याने निवडणूक आयोगाची स्वायत्तता नष्ट झाली. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर आलेले हे भाजप सरकार आहे. असा आरोप यावेळी विजय वेडेट्टीवार यांनी केला. तसेच भाजपचे किरीट सोमय्या कुठली चांदणी वा तारा आहे हे कळायला मार्ग नाही. सोमय्या नाटकातील सोंगाड्या आहे. आवश्यक त्या ठिकाणी त्यांना पुढे केले जाते. काम झालें की, त्यांचे कपडे काढून टाकले जातात. ज्यांच्यावर सोमय्यानी आरोप केले ते सगळे मंत्रीमंडळात मंत्री असून सरकारमध्ये सहभागी आहे. यांनी आरोप करायचे आणि भाजपने त्यांना उचलून घायचे, अश्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. असेही ते म्हणाले.