आजपासून सावित्री बाई फुले व राजमाता जिजाऊ संयुक्त जयंती महोत्सव
तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन
जवाहरनगर :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती महोत्सव १० ते १२ जानेवारी पर्यंत समता विचार मंच इंदिरानगर,सावरी येथे द्वारे, अंगणवाडी जवळील भव्य पटांगणात आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार १० जानेवारी ला
ब्ल्यु पँथर ढोल ताशा पथक, लेझीम, दांडपट्टा या पारंपारिक खेळांच्या प्रचंड गजरात समता मिरवणुकीचे आयोजन भिमगिरी पहाडी राजेदहेगांव येथून सायं. ४ वाजता.ठाणेदार भिमाजी पाटील, सहाय्यक ठाणेदार पुरुषोत्तम राठोड, रजेदहेगव सरपांच स्वाती हुमने,
सावरी सरपंच. गिरीष ठवकर, मदनपाल गोस्वामी यांचे हस्ते या मिरवणुकीचा प्रारंभ होईल.
शनिवार, दि. ११ जाने. २०२५ ला सकाळीं १०.३० वाजता
राष्ट्रीय संगीतमय प्रबोधनपर तमाशा कार्यक्रमाचे उद्घघाटन व मार्गदर्शक.डीएसपी. संघ, नागपुर डॉ. बाबा वाणी. बी.अनिरु महाणाम,
रात्री ८.०० वा.”मुलींची पहिली शाळा”संगीतमय तीन अंकी नाटक कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार प्रशांत पडोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे जि. प. सदस्य, प्रेमदास वणवे,पं. स. सदस्या, भाग्यश्रीताई कांबळे, पत्रकार,प्रशांत देसाई, शशिकांत भोयर,सरपंच गिरीश ठवकर, ,उपसरपंच संदिप नागदेवे, ग्रामविकास अधिकारी हरिदास पडोळे, ग्रा.पं. सदस्यगण रवि आगाशे, प्रगती कांबळे,प्रिया धांडे, देवांनणा मरस्कोल्हे, ममता बागडे, शकुन दिघोरे, निकेश मोटघरे, मनिषा चाचेरकर, निखिल चव्हाण, शेलेश चौधरी, रिया कांबळे. विजय चिचुरकर, बिंदू गजभिये, पायल बागडे, दुर्गा बन्सोड, संगीता शहारे, पोलिस पाटील गोविंदा कुरंजेकर, तंमुस अध्यक्ष ,अमर मन्नाडे, अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस, बिट्ट सुखदेवे, यांचे उपस्थितीत उद्घघाटकिय कार्यक्रम ,रविवार, दि. १२ जाने. २०२५ ला
सकाळी ९.०० वाजेपासून
“कलाकार मेळावा “या मेळाव्यात भजन, किर्तन, नाटक, गोधळ, दंडार, तमाशा, अशा विविध लोककला सादर करता येईल. कलेचे सादरीकरण धोर पुरुष, संत महापुरुष, महामानव, महान राजे तसेच कार्यक्रमाच्या विषयाच्या अनुसंघाने कलाकारांनी कलेचे सादरीकरण यावेळी सादर करतील.
लक्ष्मण हारगुडे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्योती बाधाये, ,मनोज कोटांगले, कार्तिक मेश्राम, भिमराव लाडे, शिलवंत रंगारी, राजेश बौद्ध, डॉ. देवानंद मेश्राम, अभ्यंकर बोरकर, सय्यद जाफरी, धम्मपाल मेश्राम, मनोज गोस्वामी, यांचे उपस्थित होणार.
सायं. ६.वाजेपासून स्नेहभोजन व सायं. ७.वा.
स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा या तीन दिवसीय कार्यक्रमात अग्रिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन समता विचार मंच, इंदिरानगर, सावरी,राजेदहेगांव यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
……